नवी दिल्ली : देशभरात नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. नऊ दिवस हा शक्तीचा उत्सव असणार आहे. मातेची पूजा केली जाईल. भाविक आनंदाने गरबा खेळतील. मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. दरम्यान, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी एका दक्षिण आफ्रिकी नागरिकानेही मंदिराला भेट दिली. हा नागरिक साधासुधा नागरिक नाही, तर तो आहे दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा स्टार ऑलराऊंडर केशव महाराज यांच्याबद्दल. केशव महाराज यांच्या मनात हिंदू देवी-देवतांबाबत नेहमीच विशेष श्रद्धा होती. (keshav maharaj visits shree padmanabhaswamy temple in thiruvananthapuram wishes happy navratri to his fans)

धोतर घालून पोहोचले मंदिरात

भारताविरुद्ध तीन सामन्यांची T-२० मालिका आणि नंतर एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिका संघाचा खेळाडू केशव यांनी तिरुवनंतपुरममधील पद्मनाभस्वामी मंदिरात प्रार्थना केली. या खास क्षणाचा फोटोही त्याने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे. पारंपारिक पद्धतीने धोतर घालून पूजा करताना केशव महाराजांचा फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. कॅप्शनमध्ये त्याने सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा देत जय माता दी असे लिहिले आहे.

keshav maharaj in Mandir

केशव महाराजांनी मंदिरात पूजा केली

यूपीतील सुलतानपूरशी संबंध

७ फेब्रुवारी १९९० रोजी डर्बन येथे जन्मलेले केशव महाराज हे डावखुरे फिरकी गोलंदाज आहेत. वेगवान गोलंदाज म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणारे केशव महाराजांचे पूर्वज एकेकाळी भारतात राहत होते. त्यांना १८७४ मध्ये उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथून दक्षिण आफ्रिकेत काम करण्यासाठी आणण्यात आले होते. केशवच्या कुटुंबात चार सदस्य आहेत. केशव यांच्या व्यतिरिक्त त्याचे आई-वडील आणि एक बहीण आहे.

वडील आणि आजोबाही खेळायचे क्रिकेट

केशव महाराज यांचे वडील आत्मानंद हे देखील एक क्रिकेटपटू होते. ते दक्षिण आफ्रिकेसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळले होते. मात्र, आत्मानंद यांना कधीच कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही. आजोबाही क्रिकेटपटू होते. केशव महाराज हे हनुमानाचे परमभक्त आहेत. दक्षिण आफ्रिकेत राहूनही ते सर्व प्रथा पाळतात. तेथे ते भारतीय सण साजरे करतात.

पहिला सामना २८ ऑक्टोबरला

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T-२० मालिकेतील पहिला सामना २८ ऑक्टोबर रोजी तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफील्ड स्टेडियमवर होणार आहे. सामन्याच्या एक दिवस आधी नेटमध्ये धडकण्यापूर्वी मेन इन ब्लूजला सोमवारी एक दिवस सुट्टी मिळण्याची शक्यता आहे. विमानतळावरून रोहित शर्माची टीम स्टेडियमवर पोहोचताच चाहत्यांची गर्दी झाली होती. T-२० विश्वचषक संघातून वगळल्यानंतर अनेकांनी स्थानिक हिरो असलेल्या संजू सॅमसनचे नाव घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here