cyrus mistrys car crash: उद्योगपती सायरस मिस्त्रींचं तीन आठवड्यांपूर्वी कार अपघातात निधन झालं. ४ सप्टेंबरला मिस्त्रींच्या कारला अहमदाबाद-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला. पालघरमधील चारोटी येथील सूर्या नदीजवळ मिस्त्रींच्या मर्सिडीज कारला अपघात झाला. तज्ज्ञांच्या स्वतंत्र टीमनं या भागातील रस्त्याची पाहणी करून आढावा घेतला.

आंतरराष्ट्रीय रस्ते संघटनेच्या (आयआरएफ) भारतातील विभागानं तयार केलेल्या पथकानं एनएच-४८ वरील ७० किलोमीटर भागाची पाहणी केली. या रस्त्यावरील अपघातांची संख्या कमी करण्यासाठी त्यांच्याकडून काही उपाय सुचवण्यात आले आहेत. पुलांच्या, डायव्हर्जनच्या आधी वेगमर्यादेचे फलक लावण्यात यावेत, कॅरिजवे अरुंद होत असलेल्या तशा सूचनांचे फलक लावले जावेत, देखभाल-दुरुस्तीचं काम करण्यात यावं, दुभाजक नसलेल्या भागांत ते तयार करण्यात यावे, रस्त्यांवर योग्य मार्किंग्स करण्यात यावी, असे उपाय सांगण्यात आले आहेत.
मिस्त्रींच्या अपघाती मृत्यूनंतर आठवड्याभरात रस्त्याचं ऑडिट करण्यात आलं. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं (एनएचएआय) मंजुरी दिल्यानंतर रस्त्याचा आढावा घेण्यात आल्याची माहिती आयआरएफनं दिली. आयआरएफनं आपला अहवाल एनएचएआयला दिला आहे. आयआरएफनं कारचं ऑडिट केलेलं नाही. त्यांनी केवळ रस्ते सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांचा आढावा घेतला आहे. राज्य सरकारकडून अपघाताचा तपशीलवार फॉरेन्सिक तपास सुरू आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.