तिरुपती: उद्योगपती सायरस मिस्त्रींचं तीन आठवड्यांपूर्वी कार अपघातात निधन झालं. ४ सप्टेंबरला मिस्त्रींच्या कारला अहमदाबाद-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला. पालघरमधील चारोटी येथील सूर्या नदीजवळ मिस्त्रींच्या मर्सिडीज कारला अपघात झाला. या अपघातामुळे मर्सिडीज कारमधील सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. महागड्या कार घेऊनही जीव जात असेल, तर मग अशा कार आणि त्यातली सेफ्टी फीचर्स काय कामाची, असे प्रश्न विचारले गेले.

सायरस मिस्त्रींच्या अपघाताची घटना ताजी असताना आता आंध्र प्रदेशातील तिरुपतीमध्ये मर्सिडीज कारला अपघात झाला आहे. ट्रॅक्टर आणि मर्सिडीज कारनं एकमेकांना धडक दिली. मर्सिडीज बेंझची धडक बसल्यानंतर ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले. तर कारमधील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली.

सोमवारी तिरुपतीच्या जवळ बायपास रोडवर अपघात झाला. मर्सिडीज कारच्या समोर अचानक एक ट्रॅक्टर आला. ट्रॅक्टर चुकीच्या दिशेनं आल्यानं मर्सिडीज चालकाला धडक टाळण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. ट्रॅक्टर मर्सिडीजच्या डाव्या बाजूला धडकला. ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले. या अपघातात ट्रॅक्टरचा चालक किरकोळ जखमी झाला.
मिस्त्रींच्या कारला अपघात झाला त्या रस्त्यावर…; तज्ज्ञांच्या टीमनं दिली चिंताजनक माहिती
मिस्त्रींच्या कारला अपघात अन् मर्सिडीजच्या सुरक्षेवर सवाल
प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी संचालक सायरस मिस्त्रींच्या कारला ४ सप्टेंबरला अपघात झाला. ते अहमदाबादहून मुंबईला परतत असताना पालघरमधील चारोटी येथे त्यांची कार दुभाजकाला धडकली. कारचा वेग जास्त असल्यानं भीषण अपघात झाला. त्यात मिस्त्री आणि त्यांच्या मित्राचा जागीच मृत्यू झाला.

सायरस मिस्त्री त्यांच्या मर्सिडीज बेंझ कारमधून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरुन प्रवास करत होते. कारला अपघात झाल्यानंतर सेफ्टी फीचर्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. मिस्त्री वापरत असलेल्या कारला सुरक्षेच्या बाबतीत ५ स्टार रेटिंग आहे. मिस्त्री GLC 220 D 4Matic कारमधून मुंबईकडे येत होते. ही कार १९५० सीसी इंजिन क्षमतेची असून त्यात सुरक्षेसाठी ७ एअरबॅग्ज आहेत.

27 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here