मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्षाचे कारण ठरलेल्या वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्पाचा वाद आणखीनच चिघळला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) पुण्यातील प्रादेशिक अधिकाऱ्यांनी वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत कोणता करारच झाला नव्हता, असे सांगत शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची कोंडी केली होती. त्यानंतर आता शिवसेनेने यासंदर्भातील काही पुरावे बाहेर काढून शिंदे-फडणवीस सरकारची उलट कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

शिवसेनेच्या ट्विटर हँडलवरून यासंदर्भात काही छायाचित्रे ट्विट करण्यात आली आहेत. यामध्ये मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट केलेल्या माहितीचा दाखला देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेदान्त-फॉक्सकॉनच्या शिष्टमंडळाची भेट घेतल्याचा फोटो CMOच्या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला होता. तसेच एमआयडीसीच्या जर्नलमध्येही या प्रकल्पासंदर्भात माहिती छापून आली होती. मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एवढं खोटं का बोलले? हा महाराष्ट्राशी धोका आहे, अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे. यावर आता भाजप आणि शिंदे गटाकडून काय प्रत्युत्तर दिले जाणार, हे पाहावे लागेल.

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गेल्याने झालेलं नुकसान कसं भरून काढायचं? पुण्यातील तज्ज्ञांनी सांगितली आयडिया

MIDC च्या अधिकाऱ्यांनी नेमकं काय म्हटलं?

वेदान्त-फॉक्सकॉन कंपनीसोबत महाराष्ट्र शासनाचा कोणताही करार झालेला नाही. कंपनीला महामंडळाकडून जागेचे वाटपही झालेले नाही. त्यामुळे जागेचा सर्व्हे क्रमांक किंवा कराराबाबत माहिती देता येत नाही, असे एमआयडीसीने राम कदम यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. या पत्रावरून कदम यांनी महाविकास आघाडीवर खोटारडेपणाचा आरोप करत टीकेची झोड उठवली. वेदान्त-फॉक्सकॉनचा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे उभारण्यासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोणताही करार झालेला नव्हता आणि कंपनीला त्या प्रकल्पासाठी कोणताही भूखंड दिलेला नव्हता, असे स्पष्ट करणारा कागदोपत्री पुरावा उपलब्ध झाला असून या विषयात खोटे बोलून राज्यातील जनतेची दिशाभूल केल्याबद्दल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना केली.

भाजप गुजरातचे हित जपण्यात व्यस्त, बडा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर जयंत पाटील संतापले, लागोपाठ ३ ट्विट
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शनिवारी तळेगाव येथे वेदान्त-फॉक्सकॉन विषयावरून केलेले आंदोलन हा खोटारडेपणा होता. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अशी खोटारडी आंदोलने बंद करावीत. अन्यथा ते जेथे आंदोलन करतील तेथे जाऊन आम्ही त्यांना जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा बावनकुळे यांनी दिला. कंपनीसोबत राज्य सरकारचा सामंजस्य करार झालेला नाही आणि कंपनीस महामंडळाकडून जागेचे वाटप झालेले नाही. अशा स्थितीत हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला ही महाविकास आघाडीच्या नेत्यांची तक्रार खोटारडेपणाची आहे. प्रत्यक्षात आघाडी सरकारने कंपनीशी करार केला नाही आणि जमीनही दिलेली नाही, हे आता उघड झाले आहे. त्यामुळे हे पत्र म्हणजे हा प्रकल्प महाविकास आघाडीमुळेच राज्याबाहेर गेल्याचा पुरावा आहे, असे बावनकुळे म्हणाले.

31 COMMENTS

  1. Great post. Keep posting such kind of information on your page.
    Im really impressed by it.
    I will certainly digg it and in my opinion recommend to my friends.
    I am confident they will be benefited from this web site.

  2. Excellent post. I was checking constantly this
    Extremely useful information specially the last part
    care for such info much. I was seeking this particular information for a very long
    time. Thank you

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here