Maharashtra Politics | बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत सावलीप्रमाणे वावरणारे चंपासिंह थापा गळाला लागल्याने शिंदे गटाचा हुरूप थोडासा का होईन वाढला आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या अखेरच्या क्षणापर्यंत त्यांच्यासोबत राहिलेल्या चंपासिंह थापा यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. मातोश्रीवर थापा यांचं ‘वजन’ असल्याचंही बोललं जातं. ठाकरे कुटुंबासाठी हा मोठा धक्का मानला जातो.

 

हायलाइट्स:

  • थापाचा शिंदे गटातील प्रवेश अनेकांसाठी धक्कादायक ठरला होता
  • आता मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करणार आहे
मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सहाय्यक आणि निकटवर्ती चंपासिंह थापा यांनी मंगळवारी शिंदे गटात प्रवेश केला होता. थापा यांनी प्रदीर्घ काळ मातोश्रीवर राहून बाळासाहेबांची सेवा केली होती. या काळात ते सावलीसारखे बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत वावरायचे. त्यामुळे चंपासिंह थापा (Champa Singh Thapa) यांचा शिंदे गटातील प्रवेश अनेकांसाठी धक्कादायक ठरला होता. मात्र, चंपासिंह थापा यांनी आपण शिंदे गटात का आलो, याचे कारण स्पष्ट केले आहे. मला बाळासाहेब ठाकरे (Balasheb Thackeray) यांचे विचार पटतात. तसंच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचेही विचार पटतात. आपल्या मनाने जो कौल दिला तो मी मान्य केला आणि मी शिंदे गटात आलो, असे चंपासिंह थापा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

नवरात्रीचा पहिला दिवस अत्यंत शुभ आहे. त्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांना भेटायला आलो. ठाण्यातील टेंभी नाका देवीचं दर्शन घेतलं. आता मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करणार आहे. शिंदे साहेब जे आदेश देतील, ते पाळणार, असेही थापा यांनी म्हटले होते.
ठाण्यातील टेंभी नाक्यावर आनंद दिघेंचे दोन कट्टर शिष्य पुन्हा आमने-सामने
गेल्या काही काळात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील मनोहर जोशी, लीलाधर डाके, गजानन किर्तीकर या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्या माध्यमातून शिंदे यांनी शिवसेनेतील या बुजुर्गांना आपल्या गटात खेचण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा होती. परंतु, तुर्तास तरी बाळासाहेब ठाकरेंसोबत काम केलेल्या या ज्येष्ठ नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याच बाजूला राहणे पसंत केले आहे. त्यामुळे जुन्या शिवसैनिकांशी भावनिक नाळ जोडलेल्या या नेत्यांना आपल्या गटात आणण्याचा एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला होता. परंतु, बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत सावलीप्रमाणे वावरणारे चंपासिंह थापा गळाला लागल्याने शिंदे गटाचा हुरूप थोडासा का होईन वाढला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या अखेरच्या क्षणापर्यंत त्यांच्यासोबत राहिलेल्या चंपासिंह थापा यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. मातोश्रीवर थापा यांचं ‘वजन’ असल्याचंही बोललं जातं. ठाकरे कुटुंबासाठी हा मोठा धक्का मानला जातो.
Shivsena vs Eknath Shinde: राज्यातील सत्तासंघर्ष निर्णायक वळणावर, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची उत्सुकता

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

चंपासिंह थापा यांच्या प्रवेशानंतर एकनाथ शिंदे यांनी आनंद व्यक्त केला होता. बाळासाहेबांसोबत कोण राहतो? असे जर कुणी विचारले, तर लगेच नाव यायचं ते चंपासिंह थापा यांचं. ते बाळासाहेबांसोबत सावलीसारखे राहिले. आता थापा हे सुद्धा देवीच्या उत्सवात सामील झाले असून त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि हिंदुत्वाचे विचार पुढे नेत असल्याचे सांगितले. जी चूक २०१९ ला व्हायला नको होती, ती तुम्ही दुरुस्त करत आहात. बाळासाहेब ठाकरेंचे विचार जो कोणी पुढे नेईल. त्याच्याबरोबर सदैव राहील, असे सांगत त्यांनी बाळासाहेबांच्या आणि हिंदुत्वाच्या विचारांच्या आपल्या शिवसेनेला पाठींबा दिल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here