नवी दिल्ली : जगभरात मंदीचे वातावरण निर्माण झाले असून शेअर बाजारातील घसरणीमुळे अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांना मोठा झटका बसला आहे. सोमवारी, त्याच्या संपत्तीत ५६,२६२ कोटी रुपयांची (६.९१ डॉलर अब्ज) घट झाली आणि ते आता जगातील श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार त्यांची एकूण संपत्ती १३५ अब्ज डॉलरपर्यंत घसरली आणि ते Amazon चे संस्थापक जेफ बेझोस यांच्या खाली घसरले आहेत.

कमाईत अदानी तर दान करण्यात ही व्यक्ती आघाडीवर; बहुतांश संपत्ती दान करूनही ‘सर्वात श्रीमंत भारतीय’

सोमवारी बेझोसच्या संपत्तीत १.३६ अब्ज डॉलरची वाढ झाली आणि १३८ अब्ज डॉलरच्या एकूण संपत्तीसह ते पुन्हा दुसऱ्या स्थानावर विराजमान झाले आहेत. दरम्यान, टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क २४५ अब्ज डॉलर्सच्या एकूण संपत्तीसह श्रीमंतांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर कायम आहेत.

अदानी सुसाट! दररोज केली १६०० कोटींची कमाई, जाणून घ्या अंबानीपेक्षा किती पटीने अधिक आहे श्रीमंती
अदानींच्या समभागात घसरण
अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये २.२९ टक्क्यांनी घट झाली. अदानी ट्रान्समिशन ५.६५ टक्के, अदानी टोटल गॅस ४.७६ टक्के, अदानी ग्रीन एनर्जी ४.८३ टक्के, अदानी पोर्ट्स ५.४८ टक्के, अदानी पॉवर इट ४.९५ टक्के आणि अदानी विल्मार पाच टक्क्यांनी घसरले. म्हणजेच शेअर बाजारातील घसरणीचा अदानींना जोरदार फटका बसला आहे. याशिवाय यंदा अदानीची एकूण संपत्ती ५८.५ अब्ज डॉलरने वाढली तर अमेरिकन उद्योगपती बेझोसची एकूण संपत्ती ५४.३ अब्ज डॉलरने घसरली आहे. तसेच अलीकडेच अदानी यांनी अलीकडेच बेझोसला मागे टाकत श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले होते, मात्र बेझोस पुन्हा एकदा पुढे गेले आहेत.

अंबानी-अदानींमध्ये विशेष करार, दोन्ही कंपन्यांचे कर्मचारी ‘अडकणार’; पाह नेमकं काय घडलं
मुकेश अंबानी टॉप १० मधून बाहेर
दरम्यान देशातील सर्वात मौल्यवान कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी जगातील श्रीमंतांच्या यादीत पहिल्या १० मधून बाहेर पडले आहेत. सोमवारी रिलायन्सचे शेअर २.५४ टक्क्यांनी घसरले. यासह अंबानींच्या एकूण संपत्तीत २.८३ अब्ज डॉलरने घट झाली आणि ८२.४ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह मुकेश अंबानी आता श्रीमंतांच्या यादीत ११व्या क्रमांकावर घसरले आहेत. त्यांची एकूण संपत्ती यावर्षी ७.६० अब्ज डॉलरने घसरली आहे. अंबानी एकेकाळी जगातील श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर पोहोचले होते. १० व्या स्थानावर लॅरी एलिसन आहे, ज्यांची एकूण संपत्ती ८४.९ अब्ज डॉलर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here