मुंबई: घटस्फोट मागते आणि मुलाचा ताबा देत नाही या रागातून पतीने पत्नीची भर रस्त्यात गळा चिरुन हत्या केली. मुंबईतील चेंबूर परिसरात सोमवारी सकाळी ही धक्कादायक घटना घडली. इक्बाल महमंद शेख असं आरोपीचं नाव आहे. टिळकनगर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आरोपी इक्बाल महंमद शेख आणि रुपाली चंदनशिवे यांचा तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. लग्नाच्या काही दिवसातच ती इक्बालच्या घरी राहायला आली. मात्र, रुपालीचं इक्बालसह कुटुंबियांसोबत दररोज भांडण होऊ लागलं. मधल्या काळात तिला मुलगा देखील झाला. परंतु इक्बाल आणि कुटुंबियाच्या दबावाला आणि भांडणाला कंटाळून रुपाली सहा महिन्यांपूर्वी वेगळी राहू लागली. असं असलं तरी पती-पत्नीमध्ये फोनवरुन बोलणं होत असलं तरी पण दोघांमध्ये नेहमी वाद होत असत.

बाळासाहेब ठाकरेंचा ‘थापा’ एकनाथ शिंदेंना जाऊन का मिळाला? चंपासिंह स्पष्टच म्हणाले…
पतीने पत्नीला भेटायला बोलावलं आणि चाकूने वार करुन पळ काढला

इक्बाल महंमद शेखने काल संध्याकाळी रुपालीला चेंबूरच्या पीएल लोखंडे मार्गावरील नागेवाडी इथे भेटण्यासाठी बोलावले होते. यावेळी रुपालीने इक्बालकडे घटस्फोट देण्याची मागणी केली. परंतु मुलाचा दाखला देत इक्बालने घटस्फोट देणार नसल्याचं म्हटलं. यानंतर त्यांच्यात वादावादी झाली. यानंतर इक्बाल तिला जवळच्या गल्लीत घेऊन देला आणि भर रस्त्यात तिच्यावर चाकूने सपासप वार करुन तिथून पळ काढला. या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या रुपालीने जागीच जीव सोडला. या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली असता टिळकनगर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मयत रुपालीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला. तर काही वेळातच टिळकनगर पोलिसांनी आरोपी इक्बालला बेड्या ठोकल्या आहेत. रुपाली आणि इक्बाल यांना दोन वर्षांचा मुलगा देखील आहे.

मृत रुपाली ही आरोपीची दुसरी पत्नी

दरम्यान, रुपाली ही इक्बालची दुसरी पत्नी होती. याआधी त्याचा विवाह झाला होता. मात्र, पहिल्या पत्नीकडून मूल होत नसल्यामुळे इक्बालने तिला घटस्फोट दिला होता. यानंतर इक्बालने रुपाली चंदनशिवे हिच्याशी प्रेमविवाह केला होता. दरम्यान, टिळकनगर पोलिसांनी आरोपी इक्बालवर हत्येचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

कागदपत्र नको, पैसे द्या आणि निघा; लाच घेऊन वाहनांना सोडणाऱ्या पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here