नवी दिल्ली: महागाईसह रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळीतील व्यत्यय देखील जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये अडथळा निर्माण करत आहे. याशिवाय तैवानमधील राजकीय तणाव, चीनचे लॉकडाऊन, राहणीमानाचा वाढता खर्च, कर्जाचे वाहते हप्ते आणि ऊर्जा संकट यामुळे सध्या जागतिक अर्थव्यवस्था अधिक नाजूक दिसत आहे. पुरवठा खंडित झाल्याचा परिणाम अमेरिका, चीन, भारत, जपानसह सर्वच अर्थव्यवस्थांवर दिसून येत आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे २०२३ पर्यंत जागतिक अर्थव्यवस्थेवर पुरवठ्याचा दबाव असेल.

यामुळे जगभरात मंदीचा धोकाही निर्माण झाला आहे. त्याची झळ अमेरिकेसह अनेक देशात दिसत आहेत. आता भारतही यापासून दूर राहिला नसल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, देशात मंदीचा धोका नसल्याचा दावा सरकारकडून सातत्याने केला जात आहे. असे असूनही सध्या जे आकडे समोर येत आहेत, ते पाहून आपल्या मनात प्रश्न पडतो की आपणही मंदीच्या उंबरठ्यावर पोहोचलो आहोत का? हे तीन आकडे बघून मंदीचा अंदाज बांधला जाऊ शकतो.

दोन वर्ष काही खरं नाही! २००८ची जागतिक मंदी अचूक वर्तवणाऱ्या रुबिनी यांचं भाकित
रुपयाची सातत्याने घसरण
सोमवारी भारतीय चलन रुपयाने अमेरिकन डॉलरच्या तुलनेत नवा विक्रमी नीचांकी पातळी गाठली. भारतीय चलन ८९ पैशांनी कमजोर होऊन ८०.८७ वर बंद झाला. यासह अमेरिकी डॉलरसमोर रुपयाची घसरण सुरूच आहे. रुपयाची ही घसरण गेल्या ७ महिन्यांतील सर्वात मोठी घसरण आहे. यामुळे यंदाचे २०२२ हे वर्ष भारतीय चलनासाठी चांगले नसल्याचे सिद्ध होत नाही. या वर्षात आतापर्यंत रुपयाचे अवमूल्यन सुमारे १० टक्क्यांनी झाले आहे. रुपयाच्या घसरणीचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होतोच, पण महागाई वाढण्याचा धोकाही वाढतो.

जागतिक मंदीचे संकट; जागतिक बँकेचा इशारा, मध्यवर्ती बँकांच्या आक्रमक दरवाढीचा परिणाम
शेअर बाजारात खळबळ
फेडरल रिझर्व्हने अमेरिकेत एकापाठोपाठ एक व्याजदर वाढवण्याच्या निर्णयाचा परिणाम शेअर बाजारांवर दिसून येत आहे. भारतीय शेअर बाजारातही खळबळ उडाली असून सलग चार दिवस बाजार घसरणीसह बंद झाले. सोमवारी दिवसाच्या व्यवहाराअंती बीएसई सेन्सेक्स ९५३.७० अंकांनी घसरून ५७,१४५.२२ च्या पातळीवर बंद झाला. याशिवाय मंदीच्या वाढत्या भीतीमुळे परदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीमुळे देशांतर्गत बाजारात खळबळ उडाली आहे.

बाजाराच्या गेल्या चार दिवसांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर मुंबई शेअर बाजाराच्या ३० शेअर्सचा सेन्सेक्स निर्देशांक सुमारे २५०० अंकांनी घसरला. २० सप्टेंबर रोजी सेन्सेक्स ५९,७१९.७४ अंकांवर आणि २६ सप्टेंबर रोजी ५७,१४५.२२ अंकांवर बंद झाला. या घसरणीमुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे या चार दिवसांत सुमारे १३ लाख कोटी रुपये बुडाले. सेन्सेक्ससोबतच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांकही ३११.०५ अंकांनी घसरून १७,०१६.३० वर बंद झाला.

‘आयटी’ क्षेत्रात मंदीचे संकट; भारतीय टेक कंपनीने जगभरात केली कर्मचाऱ्यांची मोठी कपात
नोकरी कपात
जगभरात मंदीच्या वाढत्या धोक्याची चर्चा सुरू झाली असताना मोठ्या कंपन्यांमध्येही नोकरी कपातीच्या बातम्या समोर येत आहेत. मंदीच्या वाढत्या धोक्यात खर्चात कपातीचे कारण देत कर्मचार्‍यांना काढून टाकले जात आहे. चीनच्या अलीबाबाने एका झटक्यात १०,०० कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला तर यापूर्वी रिटेल कंपनी वॉलमार्टने २०० लोकांना कामावरून काढून टाकले होते. भारतही याला अपवाद नाही. अलीकडे, HCL Technologies, भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रातील तिसरी सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनीने जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात टाळेबंदी करत तब्बल ३५० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here