जयपूर: राजस्थानच्या राजकारणात मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेला संघर्ष उत्कंठावर्धक वळणावर पोहोचला आहे. काँग्रेस अध्यक्ष पदासह मुख्यमंत्रिपदही स्वत:कडेच ठेवण्याची इच्छा बाळगणाऱ्या अशोक गेहलोत यांच्याविरोधात पक्ष नेतृत्त्वानं पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. पक्षाध्यक्ष झाल्यास राज्यात आपल्याच गटाचा मुख्यमंत्री हवा यासाठी गेहलोत प्रयत्नशील आहेत. मात्र आता त्यांच्या मनसुब्यांना सुरुंग लागताना दिसत आहे. इंदिरा मीणा, जितेंद्र सिंह आणि मदन प्रजापती यांच्यानंतर आता संदीप यादव यांचा सूर बदलला आहे. हे चारही जण गेहलोत समर्थक आमदार आहेत.

गेहलोतच मुख्यमंत्री राहावेत. त्यांच्यासाठी पक्षानं एक व्यक्ती, एक पद धोरण बाजूला ठेवावं. ते शक्य नसेल तर गेहलोत यांच्या गटातील आमदाराला मुख्यमंत्रिपद करावं, अशी भूमिका गेहलोत समर्थकांनी घेतली होती. मात्र आता ही भूमिका बदलताना दिसत आहे. आता हे चारही आमदार सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्याचा आग्रह धरू लागले आहेत. रविवारी संध्याकाळी गेहलोत समर्थकांची बैठक शांती धारिवाल यांच्या घरी झाली. त्या बैठकीला चारही आमदार उपस्थित होते.
राजस्थानातील राजीनामा नाट्य भोवणार, अशोक गेहलोतांना धक्का बसणार? अध्यक्षपदाबाबत मोठी अपडेट
मंगळवारी सकाळी गेहलोत गटातील आमदार संदीप यादव यांनी एक व्हिडीओ मेसेज जारी केला. मी काँग्रेस नेतृत्त्वासोबत आहे. त्यांचा प्रत्येक निर्णय मला मान्य आहे, असा मेसेज यादव यांच्याकडून जारी करण्यात आला. याआधी आमदार इंदिरा मीणा यांचे सूरही अशाच पद्धतीनं बदललेले दिसले. आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बोलावण्यात आलं होतं. त्यानंतर धारीवाल यांच्या घरी जाण्यास सांगण्यात आलं. तिथे एका कागदावर स्वाक्षरी घेण्यात आली. त्या कागदावरील मजकूर आम्ही वाचला नाही. सचिन पायलट यांच्या नावाला आमचा कोणत्याही स्वरुपाचा विरोध नाही. ते मुख्यमंत्री झाल्यास आमच्यासाठी चांगलंच असेल, असं मीणा म्हणाल्या.
गृहकलहाने काँग्रेस कोंडीत! राजस्थानच्या नेतृत्वबदलावरुन काँग्रेसमध्ये पेच, अध्यक्षपदासाठी नवे नाव?
शांती धारीवाल यांच्या घरात राजीनामा देणाऱ्या आमदार जितेंद्र सिंह यांचीही भूमिका बदलली आहे. राजीनामा देणं चूक आहे. मी नेतृत्त्वासोबत आहे. कोणालाही मुख्यमंत्री केलं तरीही मी त्यांच्यासोबत असेन, इसं सिंह यांनी सांगितलं. तत्पूर्वी रविवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास मुख्यमंत्री निवासस्थानी काँग्रेस आमदारांची बैठक होणार होती. मात्र त्याआधी सगळे आमदार संसदीय कामकाज मंत्री शांती धारीवाल यांच्या घरी जमले. धारीवाल हे गेहलोत यांचे कट्टर समर्थक आहेत. रात्री ८ वाजता आमदारांनी विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशींना भेटले. तिथे ८२ आमदारांनी सामूहिक राजीनामा दिला.

28 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here