Thane Local News : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे आणि उद्धव ठाकरेंचे खंदे समर्थक आणि कल्याणचे जिल्हाप्रमुख विजय साळवी यांना तडीपाराची नोटीस बजावण्यात आली आहे

हायलाइट्स:
- शिवसेनेचे विजय साळवींना तडीपाराची नोटीस
- विजय साळवी कल्याणचे जिल्हाप्रमुख
- पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांनी बजावली नोटीस
त्यामुळे खळबळ उडाली असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. शिंदे गटात दाखल होण्यासाठी सगळ्यांनी आपली तत्वे, निष्ठा गहाण ठेवायच्या का असा प्रश्न जिल्हाप्रमुख साळवी यांच्यासह संतप्त शिवसैनिकांनी उपस्थित केला आहे. तर नोटीस मिळाल्याच्या वृत्ताला साळवी यांनी दुजोरा दिला आहे.
महात्मा फुले पोलीस ठाणे, बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीत अनेक गुन्हेगारीचे प्रकार आपण केले आहेत. तुमच्याकडून परिसरातील नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होऊन त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. तुमच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सामान्य नागरिक आपल्या विरुद्ध साक्ष, जबाब देण्यास पुढे येत नाहीत. अपराध करण्यासाठी तुम्हाला संधी मिळताच तुम्ही सार्वजनिक ठिकाणी पोलीस ठाण्यात दाखल १५ गुन्हे दाखल आहेत. यावरुन आपली गुन्हेगारी पार्श्वभूमी स्पष्ट होत आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा भाग आणि तुम्हाला गु्न्हेगारी कृत्यापासून परावृत्त करण्यासाठी तुम्हाला ठाणे, रायगड आणि मुंबई जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात येत आहे, असं सहाय्यक पोलीस आयुक्त रमेश माने पाटील यांनी नोटीसमध्ये म्हटलं आहे.
नवरात्रोत्सवाचा उत्साह मोठा, युवतींसोबत खासदार नवनीत राणांनी धरला फेर
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.