सोनालीच्या मैत्रिणी तिच्या खोलीत पोहोचल्या. त्यावेळी ती बेशुद्धावस्थेत होती. तिच्या शेजारी ऍनेस्थेशियाची इंजेक्शन्स होती. सोनालीला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिचा मृत्यू झाला होता. ऍनेस्थेशियाच्या ओव्हरडोसमुळे सोनालीचा जीव गेला. तिनं आत्महत्या केली. सोनालीच्या निधनानं तिच्या मैत्रिणींना धक्का बसला. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.
सोनालीच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट सापडली. माझ्या आयुष्यात आता काहीच शिल्लक राहिलेलं नाही. जगण्याची कोणतीच आशा नाही, असा मजकूर त्यात होता. जगाचा निरोप घेताना सोनालीनं कुटुंबीयांची माफी मागितली. सोनालीच्याच रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या डॉ. अंकितसोबतचे संबंध आत्महत्येस कारण ठरले. अंकित विवाहित होता. काही दिवसांपूर्वीच अंकित आणि सोनाली यांच्या प्रेमसंबंधांची माहिती अंकितची पत्नी आकांक्षाला समजली.
डॉ. आकांक्षानं रुग्णालयात येऊन सोनालीशी वाद घातला. तिला बरंच सुनावलं. त्यानंतर आकांक्षानं सोनालीच्या कुटुंबायांची भेट घेऊन सर्व प्रकार त्यांना सांगितला. सोनालीच्या कुटुंबीयांना झालेला प्रकार आवडला नाही. त्यांनी सोनालीला समजावण्याचा प्रयत्न केला. घडलेल्या घटनांमुळे सोनाली तणावाखाली होती. एका बाजूला कुटुंबाला दुखवायचं नाही आणि दुसऱ्या बाजूला डॉ. अंकितसोबतच्या प्रेमसंबंधात आलेल्या अडचणी अशा परिस्थितीत सोनाली अडकली. त्यामुळे तिनं आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.