नवी दिल्ली : आठ पत्नींसोबत राहिल्यामुळे जगभर प्रसिद्ध झालेल्या व्यक्तीच्या दोन पत्नींनी या नात्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. त्याच वेळी, पुरुषाच्या पहिल्या पत्नीने सांगितले की सामूहिक नातेसंबंधातील जीवन हजारो चमत्कारांनी भरलेले दिसते.

आर्थर ओ उर्सो ८ बायकांसह ब्राझीलमधील जोआओ पेसोआ येथे राहतो. तो इंस्टाग्रामवरही खूप लोकप्रिय आहे आणि त्याच्या भव्य जीवनशैलीशी संबंधित पोस्ट करत राहतो. पण या जीवनशैलीमुळे तो काही लोकांच्या निशाण्यावरही राहतो. अलीकडेच काही लोकांनी त्याच्या नवीन घरावर ‘राक्षसी कुटुंब, दूर जा’ असं लिहिलं होत. विशेष बाब म्हणजे ब्राझीलमध्ये एकापेक्षा जास्त विवाह करणे बेकायदेशीर आहे. असं असूनही, नोव्हेंबर २०२१ मध्ये आर्थरने एकाच वेळी ९ महिलांशी लग्न केलं. पण नंतर एका पत्नीने या नात्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.
युवासेनेच्या महिला पदाधिकाऱ्याला बांगर समर्थकाची शिवीगाळ, ठाकरेंकडून स्वतः फोन करुन धीर
आता त्याच्या २ बायकांनी आर्थर आणि त्याच्या ८ बायकांच्या नात्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. नात्याची सुरुवात ‘वेडेपणा’ असे बायकांनी सांगितलं आहे. आर्थरचे पहिले लग्न लुआनाशी झाले होते. दोघांचे सात वर्षांपूर्वी लग्न झाले होते. लुआना म्हणाली की, आम्हाला ओपन रिलेशनशिप एक्सप्लोर करायची होते. मला वाटले की ते खूप वेगळे असेल आणि मी ते मान्य केलं.

लुआनाने सांगितले की ती आणि आर्थर एका पार्टीत त्याच्या होणाऱ्या आठ बायकांना भेटल्या. आर्थर म्हणाला की, आम्ही दोघेही अशा जोडीदाराच्या शोधात होतो, ज्यांना नवीन गोष्टी अनुभवायच्या आहेत. आर्थरची दुसरी पत्नी लोरेना हिनेही या नात्याबद्दल अनेक व्यावहारिक गोष्टी सांगितल्या. इतके लोक एकत्र कसे राहतात हे त्यांनी सांगितलं. त्यावर, सुरुवातीला हे नाते वेडेपणासारखे वाटले कारण इतक्या लोकांसोबत राहण्याची सवय कोणालाच नव्हती.

जेव्हा अनेक प्रकारचे लोक एकत्र राहतात तेव्हा अनेक लहानमोठ्या भांडणी होत असत. हे माझ्यासोबत खासकरून मासिक पाळीच्या वेळी होत असे. यामुळे सर्वजण माझ्याकडे जास्त लक्ष देत असत. पण लॉरेना म्हणाली की लवकरच सर्व काही ठीक होऊ लागले. ते म्हणाले- आता परिस्थिती बरीच सुधारली आहे. आमचे नाते खूप चांगले झाले आहे. लोरेनाने असंही सांगितले की तिने आणि आर्थरच्या इतर पत्नींनी घरातील कामे सर्वांमध्ये समानपणे वाटून घेतली आहेत.

कितीही अफजल खान आले तरी घाबरणार नाही, सुप्रीम कोर्टातील सुनावणीदरम्यान ठाकरेंची प्रतिक्रिया

29 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here