आमदारांच्या निधीवरूनही साधला निशाणा
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर जी काही कारणं दिली जातात त्यामध्ये आमदारांना निधी मिळत नसल्याचं मुख्य कारण होतं. या मुद्द्यावरूनच शिंदे यांच्यासह त्यांच्यासोबत गेलेले ४० बंडखोर आमदार टीका करत होते. संदिपान भुमरे यांनीही आता याबाबत बोलताना म्हटलं आहे की, ‘महाविकास आघाडी सरकारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणायचे की सरकारकडे निधी नाही. मग आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यावर आमदारांना देण्यासाठी निधी कसा आला?’ असा सवाल भुमरे यांनी उपस्थित केला आहे.
‘…तेव्हा एकनाथ शिंदेंनी पोलीस अधिकाऱ्याला दम दिला’
बंड करत एकनाथ शिंदे हे सुरतला निघाले तेव्हा त्यांना अडवण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. ट्राफिक जाम करून एकनाथ शिंदे आणि आम्हाला अडवण्यात आलं. कारण उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांना आम्हाला गुजरातला जाऊ द्यायचं नव्हतं. त्यावेळी शिंदे यांनी एसीपीला फोन करून दम दिला होता,’ असं म्हणत संदिपान भुमरे यांनी बंडखोरीचा किस्सा सांगितला आहे.