कोल्हापूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे हे राजकारणात सक्रिय होणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून ऐकायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी तेजस यांच्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांमुळे या चर्चेला अधिकच बळ मिळाले होते. त्यानंतर आता तेजस ठाकरे यांचा कोल्हापुरातील शिवसेनेच्या मेळाव्यात बॅनरवर नेत्यांसोबत तेजस ठाकरे यांचाही फोटो झळकल्याने तेजस ठाकरे यांचा राजकारणात प्रवेश झाल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. (photo of tejas thackeray first time appeared on a banner at a shiv sena rally in kolhapur)

शिवसेनेच्या या बॅनरवर उद्धव ठाकरे यांचा मोठा फोटो आहे. तर वर बॅनरच्या डाव्या बाजूने छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो देण्यात आला आहे. नंतर दिवंगत बाळासाहेब ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत. तर आदित्य ठाकरे यांच्या फोटोनंतर तेजस ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईत ठिकठिकाणी दहिहंडीनिमित्त लावलेल्या बॅनर्सवर देखील तेजस ठाकरे यांचे फोटो झळकले होते. त्यावेळी त्यांचे वर्णन युवाशक्ती असा करण्यात आला होता. तसेच शिवसेनेतर्फे दसरा मेळाव्यासाठी लावण्यात आलेल्या बॅनर्सवर देखील तेजस ठाकरे यांचा फोटो झळकला होता. मात्र, तेजस ठाकरे यांचा राजकारणात प्रवेश झाला का या प्रश्नावर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी नकारात्मक उत्तर दिले होते.

ऐतिहासिक वारसा! अंबाबाई मंदिरात शिवकालीन तोफेसह का दिली जाते सलामी? तब्बल ११ पिढ्यांपासून एकच कुटुंब सेवेत
एका बाजूला न्यायालयात शिवसेना कोणाची, यावर सुनावणी सुरू असताना दुसऱ्या बाजूला कोल्हापुरात आज शिवसेनेच्या ठाकरे गटाचा मेळावा पार पडत आहे. या मेळाव्यादरम्यान PFI संघटनेविरोधात ही बैठक घेण्यात पडली. या कार्यक्रमात हिंदू आणि हिंदुत्वासाठी आता रस्त्यावर उतरण्याची वेळ शिवसेनेवर आली असल्याचे म्हणत शिंदे सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. विशेष म्हणजे पहिल्यांदाच कोल्हापूरच्या मेळाव्यात शिवसेनेच्या बॅनरवर तेजस ठाकरे यांचा फोटो झळकत आहे. यावरून शिवसेनेचा नवा चेहरा तेजस ठाकरे हा असणार हे आता स्पष्ट होत चालले आहे. यामुळे आता शिवसेनेचा नवा चेहरा तेजस ठाकरे यांच्या रूपात लवकरच येणार असल्याच्या चर्चाना आता उधाण आले आहे.

दरम्यान, कोल्हापुरातील शिवसेनेच्या मेळाव्यात पाकिस्तान झिंदाबाद धोषणा प्रकरणाचा निषेध करण्यात आला. मेळाव्यात शिवसेनेच्यावतीने PIF संघटनेवर बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली. तसेच सुप्रीम कोर्टात ही सुनावणी सुरू असल्याने शहरप्रमुख सुनील मोदी हे मंचावर बसूनच मोबाईलद्वारे सर्व घडामोडीवर लक्ष देत असल्याचे पाहायला मिळाले.

कोल्हापुरात सराईत गुंड जामिनावर बाहेर आला, मात्र १५ दिवसांतच जीवनाला मुकला
हिंदुत्व जपण्यासाठी आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे असे म्हणत दसरा चौकातील छत्रपती राजश्री शाहू महाराज सभागृहात हा मेळावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख सुनील मोदी , रविकिरण इंगवले यांच्यासह हर्षल सुर्वे, मंजित माने, स्मिता मांडरे सावंत उपस्थित होते. दरम्यान पाकिस्तान विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करत शिंदे सरकारवर जोरदार टीका ही करण्यात आली आहे.

दीपक केसरकर कोल्हापूरचे पालकमंत्री, धक्का नेमका कोणाला?
दरम्यान कोल्हापुरात आज मेळावा सुरू असताना शिवसेना शहर प्रमुख सुनील मोदी हे पंचावर बसून मेळाव्याचे नेतृत्व करत असताना दुसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्टामध्ये सुरू असलेल्या प्रत्येक सुनावणीकडे त्यांचं लक्ष पाहायला मिळालं. मंचावर बसून कानात हेडफोन घालत मोबाईलच्या माध्यमातून ते या सर्वांवर लक्ष ठेवून होते. तसेच त्यांच्या मनात असलेली घालमेल ही पाहायला मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here