नंदुरबार : धडगाव तालुक्यातील बलात्कार व हत्या प्रकरणी कामात कसूर केल्याप्रकरणी जळगाव पोलीस ठाण्याच्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी शेखर पाटील यांनी याबाबत आदेशित केले आहे. या दोन्ही अधिकारी व चार कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली होती. याबाबत राजकीय पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली होती.

नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यातील खडक्या येथील विवाहित संशयित प्रकरणात नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी शेखर पाटील यांनी तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षकांवर निलंबनाची कारवाई केली आहे. पीडित मुलीच्या बापाने तिच्यावर बलात्कार होऊन तिची हत्या झाल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी जे.जे रुग्णालयात पीडिताच्या कुटुंबीयांच्या मागणीनुसार पुर्नशवविच्छेदन देखील झाले असून या प्रकरणात न्याय वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा कायम आहे.

पंकजाताईंना मंत्रिपद मिळावं, प्रीतम मुंडेंची जाहीर इच्छा, कारणही सांगितलं
या प्रकणात आधी दोन पोलीस अधिकारी आणि चार पोलीस कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली होती. मात्र, नियंत्रण कक्षातील बदली नव्हे तर यातील दोषींवर निलंबनाच्या कारवाईची चित्रा वाघ आणि सर्वपक्षीय नेत्यांची देखील मागणी केली होती. त्यानंतर या प्रकरणात हलगर्जीपणाचा ठपका ठेवत तत्कालीन पोलीस निरीक्षक गोकुळ आतडे आणि उपपोलीस निरीक्षक बी.के महाजन यांना निलंबित करण्यात आले आहे.

स्टार कर्णधारावर बलात्काराचा आरोप; क्रिकेटपटू फरार, पोलिसांनी घेतली इंटरपोल मदत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here