यापूर्वी ऑटोरिक्षाचा दर पहिल्या टप्प्यासाठी २१ रुपये इतका होता, त्यात वाढ होऊन तो आता २३ रुपये इतका झाला आहे. तर, काळी पिवळी टॅक्सीचा पहिल्या टप्प्यातील किमान दर २५ रुपये होता. त्यात वाढ होऊन तो आता २८ रुपये इतका झाला आहे. तसेच, कुल कॅब एसी टॅक्सीसाठी किमान १.५ किमीसाठी पहिल्या टप्प्याकरिता ३३ रुपये इतका दर होता. त्यात वाढ होऊन तो आता ४० रुपये इतका होईल.
अशी झाली दरवाढ
ओटोरिक्षासाठी आतापर्यंत किमान १.५ किमीसाठी पहिल्या टप्प्याकरिता २१ रुपये मोजावे लागत होते. तसेच पुढील प्रत्येक किमीसाठी १४.२० रुपये होते. आता त्यात वाढ होऊन किमान १.५ किमीसाठी पहिल्या टप्प्याकरीत २३ रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच पुढील प्रत्येक किमीसाठी १५.३३ रुपये माजावे लागणार आहेत.
तसेच, काळी पिवळी टॅक्सीसाठी आतापर्यंत किमान १.५ किमीसाठी पहिल्या टप्प्याकरिता २५ रुपये मोजावे लागत होते. तसेच पुढील प्रत्येक किमीसाठी १६.९३ रुपये होते. आता त्यात वाढ होऊन किमान १.५ किमीसाठी पहिल्या टप्प्याकरीत २८ रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच पुढील प्रत्येक किमीसाठी १८.६६ रुपये माजावे लागणार आहेत.
तर, कुल कॅब एसीसाठी आतापर्यंत किमान १.५ किमीसाठी पहिल्या टप्प्याकरिता ३३ रुपये मोजावे लागत होते. तसेच पुढील प्रत्येक किमीसाठी २२.२६ रुपये होते. आता त्यात वाढ होऊन किमान १.५ किमीसाठी पहिल्या टप्प्याकरीत ४० रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच पुढील प्रत्येक किमीसाठी २६.७१ रुपये माजावे लागणार आहेत.
नवी भाडेवाढ १ ऑक्टोबरपासून होणार लागू
खटूआ समितीच्या शिफारशीच्या आधारे सध्याचा महागाई निर्देशांक व वाढलेले इंधनाचे दर इतर संबंधित बाबी विचारात घेऊन त्याचप्रमाणे ऑटोरिक्षा व टॅक्सी चालक/मालक व त्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हितास प्राधान्य देऊन प्राधिकरणाने २६ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत वाहनांच्या भाडेवाढीचा ठराव पारित कलेला आहे. याच ठरावानुसार ही भाडेवाढ १ ऑक्टोबरपासून भाडेवाढ लागू होईल.