‘ट्रेन १८’ या एक्स्प्रेसच्या धर्तीवर तयार झालेली, क्षणार्धात वेग घेणारी आणि तातडीने ब्रेक लावण्याची क्षमता असलेली नवीन वातानुकूलित लोकल १ ऑक्टोबरपासून पश्चिम रेल्वेवर धावणार आहे. याच दिवसापासून वातानुकूलित लोकलच्या ३१ फेऱ्याही वाढवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला.

 

ac-local-train
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: ‘ट्रेन १८’ या एक्स्प्रेसच्या धर्तीवर तयार झालेली, क्षणार्धात वेग घेणारी आणि तातडीने ब्रेक लावण्याची क्षमता असलेली नवीन वातानुकूलित लोकल १ ऑक्टोबरपासून पश्चिम रेल्वेवर धावणार आहे. याच दिवसापासून वातानुकूलित लोकलच्या ३१ फेऱ्याही वाढवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला.

‘अंडरस्लंग’ अर्थात विद्युत उपकरणे खालील भागात असलेली वेगवान लोकल सन २०१९मध्ये पश्चिम रेल्वेत दाखल झाली होती. त्यानंतर आलेल्या करोनामुळे याची चाचणी रखडली. ती पूर्ण केल्यानंतर ही लोकल प्रवासी सेवेत दाखल करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. ही लोकल शनिवारपासून चालवण्यात येईल. तर वाढणाऱ्या ३१ एसी लोकल फेऱ्यांमध्ये आठ लोकल या अतिरिक्त आणि २३ लोकल फेऱ्या या बदली स्वरूपातील असणार आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी दिली.

पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरार टप्प्यात एसी लोकल फेऱ्यांची संख्या वाढवावी, अशी लेखी मागणी प्रवासी संघटनांनी पश्चिम रेल्वेकडे केली आहे. त्यानुसार अतिरिक्त आणि नवीन फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. अडीच वर्षांपासून अधिक काळ पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात ‘अंडरस्लंग’ एसी लोकल पडून होती. याबाबत मुंबई रेल्वे विकास महामंडळ आणि रेल्वे मंडळाकडून सातत्याने विचारणा करण्यात येत असल्याने अखेर ती प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here