Maharashtra Jalgaon News : आगामी निवडणुकांच्या (Elections) पार्श्वभूमीवर राजकीय  वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra News) प्रबळ पक्ष म्हणून ओळख असलेली शिवसेना (Shiv Sena), शिंदे गट (CM Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) समर्थकांमध्ये विभागली गेली आहे. तर एकीकडे महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) पक्ष आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे आम आदमी पार्टीही (Aam Aadmi Party) आता मैदानात उतरली आहे. काल (मंगळवारी) आम आदमी पार्टीचा उत्तर महाराष्ट्रातला पहिला मेळावा जळगावात पार पडला.

आम आदमी पक्षाच्या मेळाव्यासाठी  प्रदेशाध्यक्ष रंगा अण्णा राचूरे यांची उपस्थिती होती. पक्ष संघटनेसाठी महत्वाचे मुद्दे त्यांनी या मेळाव्यात मांडले. आम आदमी पक्षाचा प्रचार प्रसार आणि सदस्य नोंदणी करण्याबाबत सुचनाही यावेळी देण्यात आल्या. या मेळाव्याला जिल्हाध्यक्ष तुषार निकम, जळगाव कार्याध्यक्ष योगेश हिवरकर, उपाध्यक्ष विठ्ठलराव साळुंखे, प्रा. गणेश पवार, संघटनमंत्री डॉ. रूपेश संचेती, सचिव डॉ. महेश पवार, महिला जिल्‍हा संयोजक डॉ. अनुजा पाटील, अल्पसंख्याक जिल्हा संयोजक इरशाद खान, युवरात महाजन, प्रसिद्धी प्रमुख रईस खान यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात सहभागी झालेल्या आमदारांमध्ये जळगाव जिल्ह्यातील सर्वात जास्त म्हणजेच, पाच आमदारांचा समावेश आहे. आमदारांच्या मतदारसंघात विभागलेले शिंदे गट आणि भाजप यांच्यातील उमेदवारीवरून त्या त्या मतदारसंघातील मतभेद या दोन्ही गोष्टींचा फायदा करून घेण्यासाठी आम आदमी पार्टी तयारीला लागले असल्याचं या मेळाव्यावरून स्पष्ट होतं. एकंदरीतच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी पक्षानं कंबर कसली असून महाराष्ट्रात पाय रोवण्यासाठी पक्ष सज्ज झाला आहे. 

आम आदमी पार्टी पक्षातील कार्यकर्ता आणि नेता ही सर्वसामान्य माणसं आहेत. ही सर्वसामान्य माणसं हे आमचे उमेदवार राहणार आहे. त्यामुळे पंजाबप्रमाणे महाराष्ट्रातदेखील आम आदमी पार्टीच्या वतीनं जळगाव जिल्ह्यात निवडणूक लढविणार आहे. तसेच शिंदे गटात सामिल होणाऱ्या 40 बंडखोर आमदारांपैकी 5 आमदार हे जळगाव जिल्ह्यातील आहेत. आपण उत्तर महाराष्ट्र दौरा करत असताना लोकांच्या मनामध्ये आपण दिलेल्या मतांना लिलाव केला असून हे जळगावकरांना मान्य नाही, म्हणूनच नागरीकांना पर्याय हवा आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाची तयारी सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतही आपचे उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न असेल, अशी प्रतिक्रीया आपचे प्रदेशाध्यक्ष रंगा अण्णा राचूरे यांनी दिली आहे.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

1 COMMENT

 1. Greаt app to make usse of. Tһe app іѕ aѵailable оnly
  on the online versіon. І’ⅾ love to uѕe thhe app moгe tһe
  main reason being that I’ԁ really like this application and would rate іt 5 stars
  if you could give іt the feature tօ switch betwesen landscape аnd portrait mode ᧐n both
  tһе tablet and phones. Thiѕ ѡould be an immense difference.

  Ӏt woᥙld аlso ցet better ratings ….Ƅut otherᴡise good experience.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here