इंदूर: मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. कनाडिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शिवधाम वसाहतीत ही घटना घडली. तीन वर्षांचा चिमुकला त्याच्या भावासोबत गच्चीत खेळत होता. खेळता खेळता तो अचानक खाली पडला. कुटुंबीयांनी त्याला तातडीनं रुग्णालयात नेलं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. व्हिडीओमध्ये लहानगा गच्चीवरून पडताना दिसत आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. चिमुकला रस्त्यावर कोसळला, त्यावेळी काही जण रस्त्यावरून ये-जा करत होते.
मोक्ष मिळेल! साधूंनी तरुणाला समाधी घ्यायला लावली; खड्डा खणून जमिनीत जिवंत गाडलं अन् मग…
शिवधाम वसाहतीत राहणारा ३ वर्षांचा शशांक गच्चीवर त्याच्या भावासोबत खेळत होता. त्याचवेळी तो गच्चीतून खाली पडला. जखमी अवस्थेतीत शशांकला घेऊन कुटुंबीयांनी रुग्णालय गाठलं. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
योगा करताना नाकातून रक्तस्त्राव, मग बेशुद्ध पडली, अनुभासोबत नेमकं घडलं तरी काय?
शशांक नावाच्या चिमुकल्याचा गच्चीतून पडल्यानं मृत्यू झाला असून त्याचं वय जवळपास ३ वर्षे होतं, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश व्यास यांनी दिली. खेळता खेळता शशांक पहिल्या मजल्यावरून पडला. त्याला कुटुंबीयांनी रुग्णालयात नेलं. मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं, असं व्यास म्हणाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here