रत्नागिरी: शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री उदय सामंत यांनी जिल्हयाचे ठिकाण असलेल्या रत्नागिरी शहराची नवी शिवसेना कार्यकारीणी जाहीर केली आहे. शिवसेना उपनेते, उद्योग मंत्री उदय सामंत आणि उद्योजक किरण उर्फ भैय्यासामंत यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर नवीन शिवसेना कार्यकारणी आणि पदे जाहीर करण्यात आली आहेत. येत्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा दौरा होण्याची शक्यता आहे त्यापूर्वी जिल्हाभरात काही आवश्यक बदल केले जाण्याची शक्यता आहे.ही कार्यकारीणी जाहीर करून उद्धव ठाकरे गटाला शह देण्यासाठी हे महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.

नवीन कार्यकारणीमध्ये निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांची नावे व पद खालीलप्रमाणे

शहरप्रमुख- बिपीन बंदरकर,शहर संघटक– सौरभ मलूष्टे, नुरा पटेल, उपशहर प्रमुख -विकास पाटील, विजय खेडेकर, किरण सावंत,भाऊ देसाई, मुसा काझी,
विभाग प्रमुख –गौतम बाष्टे, रुपेश पेडणेकर,इलियास कोपेकर ,दीपक पवार,मनोज साळवी, संजय उर्फ बारक्या हळदणकर,अभिजित गोडबोले,संजय नाईक,नितीन लिमये,बाळू गांगण,इम्रान मुकादम बाबू तळेकर राहुल रसाळ ,ताहीर मुल्ला, शहर महिला संघटक, रत्नागिरी – स्मितल
उदय सामंत यांना पोलिसांसमोरच जाळून ठार मारण्याची धमकी; रत्नागिरीत खळबळ
रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांच्या उपस्थितीत ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. शिवसेना पक्ष म्हणजे ८०% समाजकारण आणि २०% राजकारण करीत कार्यरत असणारा पक्ष असून सर्व पदाधिकारी याचनुसार कार्यरत राहतील, असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला नव्या कार्यकारीणीला शुभेच्छा दिल्या.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here