मुझफ्फरनगर: उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णाच्या पोटातून स्टिलचे अनेक चमचे काढले आहेत. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून रुग्णाच्या पोटातून एक, दोन नव्हे, तर तब्बल ६३ चमचे बाहेर काढले. रुग्णाची अवस्था गंभीर आहे. डॉक्टरांनी रुग्णाला देखरेखीखाली ठेवलं आहे. रुग्णाच्या पोटातून इतक्या मोठ्या प्रमाणात चमचे काढण्यात आल्यानं सगळ्यांनाच धक्का बसला.

मंसूरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बोपाडा गावातील विजयला दारूचं व्यसन आहे. त्यामुळे कुटुंबानं त्याला नशामुक्ती केंद्रात दाखल केलं. शामलीमध्ये असलेल्या नशामुक्ती केंद्रात विजयचा जवळपास पाच महिने मुक्काम होता. तिथे असताना त्याची तब्येत बिघडली. कुटुंबियांनी त्याला मुझफ्फरनगरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्याच्या पोटातून स्टिलचे ६३ चमचे काढले. त्याच्या पोटातून निघालेले चमचे पाहून वैद्यकीय कर्मचाऱ्यांना धक्काच बसला. विजयच्या पोटातून निघालेले चमचे पाहून कुटुंबीय चकित झाले. सध्या विजयची प्रकृती गंभीर आहे.
मोक्ष मिळेल! साधूंनी तरुणाला समाधी घ्यायला लावली; खड्डा खणून जमिनीत जिवंत गाडलं अन् मग…
विजयच्या पोटात इतके चमचे कसे गेले, असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. कारण एखादी व्यक्ती जेवता जेवता चमचे खाणं शक्य नाही. या प्रकरणी विजयच्या कुटुंबियांनी नशामुक्ती केंद्राच्या कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. विजयनं अद्याप तरी याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे पोटात इतके चमचे कसे काय गेले, याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. ते रहस्य कायम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here