मुंबई : अनेक घडामोडी आणि बातम्यांच्या आधारावर आज बाजारात कोणत्या शेअर्सकडे ट्रेडर्स आणि गुंतवणूकदारांचे लक्ष असणार आहे. अशा शेअर्सची माहिती आपण घेणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने अॅक्सिस बँक, पॉवर ग्रीड, बीपीसीएल, नायका, भेल, बँक ऑफ इंडिया आदी शेअर्सचा सामावेश असणार आहे.

अॅक्सिस बँक NSE (Axis Bank)
ऍक्सिस बँकेने फेअरफॅक्सच्या गो डिजिट लाइफ इन्शुरन्समध्ये 10 टक्क्यांपेक्षा कमी भांडवल घेण्यासाठी सुमारे ५०-७० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. बँक आधीच मॅक्स लाइफ इन्शुरन्स कंपनीची प्रवर्तक आहे.

२ वर्षात २०० % पेक्षा अधिक रिटर्न, ही आईस्क्रीम कंपनी गुंतवणूकदारांसाठी ठरली गोड
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन (Power Grid Corporation)
कंपनीने सांगितले की, त्यांचे संचालक (वित्त) जी रविशंकर यांची सोमवारपासून मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) म्हणून नियुक्ती केली आहे.

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (Bharat Petroleum Corporation)
एलआयसीने गेल्या वर्षी डिसेंबरपासून बीपीसीएलमध्ये 2 टक्क्यांहून अधिक भागभांडवल सुमारे १,५९८ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. एलआयसीने बीपीसीएलमधील त्याची शेअरहोल्डिंग १५.२५ कोटी वरून १९.६१ कोटी इक्विटी शेअर्सवर वाढली आहे म्हणजेच कंपनीचे भागभांडवल ७.०३ टक्क्यांवरून ९.०४ टक्क्यांपर्यंत वाढले आहे.

शेअर बाजारातून बक्कळ कमाई करायची असेल तर ‘ही’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या काय करायचे
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स (Bharat Heavy Electricals)
भेल कंपनीने सांगितले की त्यांना एनटीपीसी (NTPC) कडून २x६६० मेगावॅटचा थर्मल पॉवर प्रकल्प उभारण्याची ऑर्डर मिळाली आहे.

एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्स (FSN E-Commerce Ventures)
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद (IIMA) ने नायकासोबत “Nykaa Chair in Consumer Technology” स्थापन करण्यासाठी करार केला आहे. .

गुंतवणूकदारांची बल्ले-बल्ले, IPO खुला होताच घसरत्या बाजारातही मिळाला ३६ टक्के परतावा
मदरसन सुमी वायरिंग इंडिया (Motherson Sumi Wiring India)
कंपनीने इक्विटी भागधारकांना बोनस शेअर जारी करण्याच्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाची ३० सप्टेंबर रोजी बैठक होईल.

टोरेंट फार्मास्युटिकल्स (Torrent Pharmaceuticals)
कंपनीने क्युरेटिओ हेल्थकेअरचे १०० टक्के भागभांडवल २,००० कोटीमध्ये विकत घेण्यासाठी करार केला.

बँक ऑफ इंडिया (Bank of India)
बँकेने ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) मधील ५.५ टक्क्यांहून अधिक हिस्सा १० कोटी रुपयांना विकत घेतला आहे.

सुप्रिया लाइफसायन्स (Supriya Lifescience)
फार्मास्युटिकल फर्मने राजीव कुमार जैन यांची कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. शिरीष अंभाईकर यांनी वैयक्तिक कारणास्तव कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा राजीनामा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here