Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by रोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Sep 28, 2022, 9:38 AM

Farmer in Maharashtra | विष्णू शंकर जाधव या शेतकऱ्याच्या शेतामध्ये गांजाची झाडे असल्याचे आढळून आले. या ठिकाणी ६१ झाडे आढळून आली असून त्याची किंमत तीन लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सर्व झाडे उपटून जप्त केली आहेत. याप्रकरणी पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या तक्रारीवरून औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात शेतकरी विष्णू जाधव याचे विरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.

 

Ganja farming
गांजाची शेती

हायलाइट्स:

  • गांजाची ६१ झाडे जप्त
  • शेतकऱ्यावर गुन्हा दाखल
हिंगोली: औंढा नागनाथ तालुक्यातील दुघाळा तांडा शिवारामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका शेतातून तीन लाख रुपये किमतीची गांजाची ६१ झाडे जप्त केली आहेत याप्रकरणी एका शेतकऱ्याविरुद्ध औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार औंढा तालुक्यातील दुघाळा तांडा शिवारामध्ये एका शेतात गांजाची झाडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, उपनिरीक्षक सुनील गोपीनवार, जमादार सुनील अंभोरे, राजू ठाकूर, प्रशांत वाघमारे, किशोर सावंत, संभाजी लकुळे, नितीन गोरे, शेख जावेद, ज्ञानेश्वर सावळे, आकाश टापरे यांच्या पथकाने काल दुपारपासूनच दुघाळा तांडा शिवारात शोध मोहीम सुरू केली होती.
करोडपती होण्याचं भूत डोक्यात शिरलं! हळदीच्या शेतात गांजाचं पिक घेतलं अन्…
यामध्ये विष्णू शंकर जाधव या शेतकऱ्याच्या शेतामध्ये गांजाची झाडे असल्याचे आढळून आले. या ठिकाणी ६१ झाडे आढळून आली असून त्याची किंमत तीन लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सर्व झाडे उपटून जप्त केली आहेत. याप्रकरणी पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या तक्रारीवरून औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात शेतकरी विष्णू जाधव याचे विरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.

उसाच्या शेतात गांजाची लागवड

गेल्या महिन्यात पोलिसांनी सांगलीत एका शेतकऱ्यावर कारवाई केली होती. या शेतकऱ्याने ऊसाच्या शेतात गांजाची झाडे लावली होती. मिरजेच्या शिपूर येथे तब्बल पाऊण एकरमध्ये गांजा शेतीची लागवड करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून कोट्यावधी रुपयांची ४०० गांजाची झाडे जप्त केली होती.
अफूची शेती ते गांजा, चरसची तस्करी
याठिकाणी उसाच्या शेतात आंतरपीक म्हणून गांजा लागवड करण्यात आल्याचे समोर आले. ही गांजाची शेती पाहून पोलिसही अवाक् झाले होते. २० गुंठ्यांत पूर्ण वाढ झालेली गांजाची झाडं आणि १० गुंठ्या मध्ये गांजाची लहान झाडं आढळून आली होती.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here