बाजाराची सुरुवात कशी झाली?
शेअर बाजाराच्या सुरुवातीला आज बीएसईचा ३० शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स ३९७.३९ अंकांच्या किंवा ०.७० टक्क्यांच्या घसरणीसह ५६,७१० वर व्यापार सुरू झाला. तसेच एनएसईचा ५० शेअर्सचा निर्देशांक निफ्टी १३६.८५ अंक किंवा ०.८० टक्क्यांच्या घसरणीसह १६,८७० वर उघडला आहे.
सेन्सेक्स-निफ्टीची परिस्थिती
सेन्सेक्सच्या ३० समभागांपैकी केवळ ४ समभाग तेजीच्या हिरव्या चिन्हात आहेत आणि उर्वरित २६ समभागांमध्ये घसरणीचा लाल चिन्ह प्रबळ आहे. दुसरीकडे, ५० निफ्टी समभागांपैकी केवळ ९ समभागांमध्ये वाढ होत आहे, तर ४१ समभागांमध्ये घसरण होत आहे.
आज कोणत्या शेअर्समध्ये तेजी
पॉवरग्रीड, सन फार्मा, डॉ रेड्डीज लॅबोरेटरीज आणि एम अँड एम चे शेअर्स आजच्या वाढत्या सेन्सेक्स समभागांमध्ये तेजीचे राहिले. विप्रो देखील आता हिरव्या चिन्हात दिसत आहे. पॉवरग्रिड, सन फार्मा, डॉ रेड्डीज लॅब्ससह सिप्ला आणि आयशर मोटर्स निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले आहेत.
कोणत्या शेअर्समध्ये घसरण
आजच्या घसरत्या सेन्सेक्समध्ये भारती एअरटेल, टीसीएस, L&T, नेस्ले, एसबीआय (SBI), टीसीएस, इन्फोसिस, मारुती, कोटक महिंद्रा बँक, बजाज फायनान्स, एचयूएल, आयसीआयसीआय बँक, टेक महिंद्रा यांचे समभाग घसरले. त्याचवेळी अल्ट्राटेक सिमेंट, टायटन, बजाज फिनसर्व्ह, अॅक्सिस बँक आणि एशियन पेंट्स, आयटीसी, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, एनटीपीसी आणि इंडसइंड बँकेचे शेअर्स तोट्यात आहेत.
दुसरीकडे, भारतीय चलन रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत आणखी विक्रमी नीचांकी पातळीवर घसरला. डॉलरच्या तुलनेत रुपया ३० पैशांनी कमजोर होऊन ८१.८८ वर उघडला आणि प्रति डॉलर ८१.९० वर घसरला.