नवी दिल्ली: प्रचंड कर्जात बुडालेल्या व्होडाफोन आयडियाच्या २५.५ कोटी ग्राहकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरपासून कंपनीचं नेटवर्क बंद होऊ शकतं. व्होडाफोन आयडियावर इंडस टॉवर्सचं जवळपास ७ हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. कर्जाची परतफेड लवकरात लवकर न केल्यास टॉवर्सचा ऍक्सेस दिला जाणार नाही, असा इशारा इंडस टॉवर्सनं दिला आहे. त्यामुळे व्होडाफोन आयडियाच्या ग्राहकांचं नेटवर्क बंद होऊ शकतं.

सोमवारी इंडस टॉवर्सच्या संचालक मंडळाची बैठक झाली. यामध्ये कंपनीच्या आर्थिक स्थितीबद्दल चर्चा झाली. व्होडाफोन आयडियाला इंडस टॉवर्सला ७ हजार कोटी रुपये द्यायचे आहेत. बैठकीनंतर इंडस टॉवर्सकडून व्होडाफोन आयडियाला एक पत्र देण्यात आलं. नोव्हेंबरपर्यंत कर्जाची परतफेड करा. अन्यथा टॉवर्सचा ऍक्सेस मिळणार नाही, असा इशाराच पत्रातून देण्यात आला.
मोठी बातमी; रिलायन्सने सुरू केले देशातील पहिले Reliance Centro स्टोअर, पाहा, काय-काय आहे विशेष!
रिलायन्स जिओ आणि एअरटेलनंतर व्होडाफोन आयडिया देशातील तिसऱ्या क्रमांकाची टेलिकॉम कंपनी आहे. कंपनीची आर्थिक स्थिती चांगली नाही. कंपनीच्या डोक्यावर मोठं कर्ज आहे. त्यामुळे आता कंपनीचे ग्राहक अडचणीत आले आहेत.

५जीमध्येही पिछाडी
एअरटेल आणि रिलायन्स जिओ दिवाळीला ५जी लॉन्च करणार आहेत. तशी तयारी दोन्ही कंपन्यांनी केली आहे. व्होडाफोन आयडियानं अद्याप तरी यासंदर्भात कोणतीही घोषणा केलेली नाही. ५जी उपकरणांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्या आणि टॉवर कंपन्यांशी करार करण्यात व्होडाफोन आयडियाला यश आलेलं नाही.
भारताशी पंगा महागात पडणार; चीन लवकरच एकाकी पडणार, वाचा काय होणार आहे
५जी सेवा सुरू करण्यासाठी व्होडाफोन आयडियानं प्रयत्न केले. मात्र उपकरण पुरवठादार आणि टॉवर कंपन्यांनी पैशांची मागणी केली. आधीची थकित रक्कम भरा, ऍडव्हान्स द्या आणि मगच करार करा, असं या कंपन्यांकडून सांगण्यात आलं. या कंपन्यांचे १३ हजार कोटी रुपये व्होडाफोन आयडियानं थकवले आहेत. फिनलँडची कंपनी नोकियाला ३ हजार कोटी रुपये द्यायचे असून स्वीडिश कंपनी एरिक्सनला १ हजार कोटी रुपये द्यायचे आहेत.

22 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here