नवी दिल्ली: पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात १६ तारखेपासून टी-२० वर्ल्डकपला सुरूवात होणार आहे. स्पर्धेत भाग घेणारे सर्व संघ जोरदार तयारीला लागले आहेत. स्पर्धेतील मुख्य फेरी २३ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून पहिल्याच दिवशी भारत आणि पाकिस्तान यांची महालढत होणार आहे.

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे. या लढतीची तयारी सुरू झाली आहे. एमसीजीने अधिकृत ट्विटरवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोची चर्चा आता क्रिकेट चाहत्यांमध्ये सुरू झाली आहे.

वाचा- स्टार कर्णधारावर बलात्काराचा आरोप; क्रिकेटपटू फरार, पोलिसांनी घेतली इंटरपोल मदत

भारत-पाकिस्तान लढतीसाठी मेलबर्न मैदानावरील पिच नव्याने तयार केले जात आहे. नवे पिच कसे तयार केले जात आहे याचे फोटो एमसीएने पोस्ट केले आहेत. जुने गवत आणि माती काढून टाकण्यात आली आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानापैकी एक असलेल्या मेलबर्नवर आता नवे पिच पाहायला मिळणार आहे.

वाचा- टी-२० वर्ल्ड कप तोंडावर; टीम इंडियाला सुधारणेची अखेरची संधी

मेलबर्नचे पिच हे सर्वसाधारण फलंदाजाला अनुकूल मानली जाते. वेगवान आणि उसळी घेणाऱ्या या पिचवर सुरुवातीला जलद गोलंदाजांना मदत मिळते. मात्र गेल्या काही सामन्यात येथे फलंदाजांना धावा करता आल्या नाहीत.

एमसीजीची क्षमता एक लाख प्रेक्षकांची आहे. जगातील सर्वात मोठे स्टेडियम भारतातील अहमदाबाद येथे असून त्याची क्षमता १.३२ लाख इतकी आहे. या मैदानावर टी-२०मध्ये सर्वोच्च धावसंख्या भारताच्या नावावर आहे. टीम इंडियाने येथे २०१६ साली ३ बाद १८४ धावा केल्या होत्या.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात काही दिवसांपूर्वी आशिया कपमध्ये दोन लढती झाल्या होत्या. ग्रुप फेरीतील लढत भारताने तर सुपर-४मधील लढत पाकिस्तानने जिंकली होती. गेल्या वर्षी म्हणजेच २०२१ साली झालेल्या वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत झाली होती. तेव्हा पाकिस्तानने भारताचा १० विकेटनी पराभव केला होता. वर्ल्डकपच्या इतिहासातील हा पाकिस्तानचा हा भारताविरुद्धचा पहिला विजय होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here