मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये दहा वर्षांच्या मुलाचा शॉक लागल्यानं मृत्यू झाला आहे. ट्रान्सफॉर्मर कव्हर करण्यासाठी लावण्यात आलेल्या तारेला स्पर्श झाल्यानं पियूष मालवीय नावाच्या मुलाचं निधन झालं. एका मित्रासोबत लपाछपी खेळत असताना हा प्रकार घडला.

ट्रान्सफॉर्मर असलेल्या भागात पियूष लपण्यासाठी गेला. ट्रान्सफॉर्मरच्या मागच्या बाजूल नाला होता. पियूष चुकून नाल्यात पडला. याच नाल्यात ट्रान्सफॉर्मरची तार पडली होती. त्यातून विद्युत प्रवाह सुरू होता. नाल्यात पडताच पियूषला शॉक लागला. पियूषचा मित्र त्याला शोधायला गेला. त्यानं तारेला स्पर्श करताच त्यालाही शॉक लागला. तो मुलगा पळत पळत पियूषच्या वडिलांजवळ गेला आणि झालेला प्रकार सांगितला. करण यांनी लेकाला वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
ट्रान्सफॉर्मरच्या चारही बाजूंनी तारा लावण्यात आल्या आहेत. मात्र त्याचा दरवाजा उघडा होता. दार उघडं असल्यानं पियूष तिथे लपायला गेला. तितक्यात तो नाल्यात पडला आणि त्याला शॉक लागला. पियूष त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. पियूषच्या अकाली निधनानं कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.