सुनील नलावडे । :
रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असूनही जिल्हा रुग्णालयात बाधित रुग्णांवर उत्तम प्रकारचे उपचार केले जात आहेत. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, तंत्रज्ञ, परिचारिक दिवस-रात्र आरोग्य सेवा बजावत असून करोना बाधित रुग्णांसह अन्य प्रकारच्या रुग्णांनाही झटपट उपचार दिले जात असल्याने अनेक अशक्यप्राय गोष्टी शक्य झाल्या आहेत. ( )

वाचा:

मंगळवारी जिल्हा रुग्णालयातून २ करोना बाधित माता व त्यांच्या बालकांना दहाव्या दिवशी करोनामुक्त करून रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यांचे रुग्णालयाबाहेर सर्व आरोग्य कर्मचारी, उपचार करणारे बालरोग तज्ञ डॉ. दिलीप मोरे, आरोग्य कर्मचारी, सामाजिक संस्थांचे प्रमुख यांनी स्वागत करून त्यांना निरोप दिला. आतापर्यंत जिल्हा रुग्णालयात ९१ नवजात बालकांची करोना चाचणी घेण्यात आली होती. त्यापैकी ३१ नवजात बालकांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह निघाला. त्या सर्व बालकांवर जिल्हा रुग्णालयाचे प्रख्यात बालरोग तज्ञ व त्यांच्या सहकारी वैद्यकीय पथकाने उपचार केले आहेत. त्यांनी नवजात बालकांसह त्यांच्या मातांनाही करोनामुक्त करण्याची यशस्वी कामगिरी पार पाडली व या सर्व रुग्णांना आता घरी सोडण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या या कामगिरीचे जिल्हावासीय व वैदयकीय क्षेत्रातील तज्ञांकडून कौतुक होत आहे.

वाचा:

बाळाला स्तनपान चालू ठेवत उपचार केल्यामुळे आई व बाळाची प्रतिकारशक्ती चांगली राहते त्यामुळे करोना बाधित विषाणू निस्तेज होऊन नवजात बालक व माता बरी होते, असा अनुभव असल्याचे मत बालरोग तज्ञ डॉ. दिलीप मोरे यांनी व्यक्त केला. अशाप्रकारची उपचार पद्धती यापूर्वी सुद्धा यशस्वीरित्या पार पाडल्याचे त्यांनी नमूद केले. आपण जिल्हा रुग्णालयात करोना बाधित माता व बालकांवर यशस्वी उपचार करण्यामागे पाठबळ देणारे उच्च तंत्र शिक्षण मंत्री , जिल्हाधिकारी, सिव्हील सर्जन, सहकारी डॉक्टर यांच्या विश्वासातूनच यशस्वी उपचार करू शकलो, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

वाचा:

रत्नागिरी बातमी | Ratnagiri News | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here