मुंबई : सणासुदीचा हंगाम सुरू झाल्याने बँकांनी ग्राहकांना भुरळ घालण्यासाठी सवलतींसह विविध सवलतीच्या ऑफर्स देऊ केल्या आहेत. एसबीआय (SBI), आयसीआयसीआय (ICICI), पंजाब नॅशनल बँकेसह (PNB) अनेक बँकांनी गृहकर्ज, वाहन कर्जाचे व्याजदर कमी करण्यासह ईएमआय (EMI) वर सवलत तसेच प्रक्रिया शुल्क (Processing Fees) न आकारण्याची घोषणा केली आहे. तसेच क्रेडिट कार्ड (Credit Card) आणि डेबिट कार्ड (Debit Card) द्वारे पेमेंट केल्यास मोठ्या सवलती आणि कॅशबॅक ऑफर देण्यात आल्या आहेत.

सणासुदीत भेट म्हणून द्यायला बेस्ट पर्याय आहेत हे Dry fruits gift pack, आरोग्यासाठी ही ठरतील फायदेशीर, Great Indian Festival मध्ये अतिशय किफायतशीर किमतीमध्ये उपलब्ध
SBI ची ऑफर
स्टेट बँक ऑफ इंडिया नवरात्रीच्या निमित्ताने कार लोन, पर्सनल लोन गोल्ड लोनवर खास ऑफर देत आहे. बँकेने कर्जावर आकारले जाणारे प्रक्रिया शुल्क माफ केले आहे. कार कर्जावरील ईएमआय प्रति लाख रुपये १,५५१ करण्यात आला आहे. यासोबतच वैयक्तिक कर्जावर प्रति लाख १,८६८ रुपये EMI आणि गोल्ड लोनवर प्रति लाख EMI ३,१३४ रुपये देण्यात आला आहे.

ब्रँड खरेदीवर कॅशबॅक
SBI ने कार्ड पेमेंटवर भरघोस सूट जाहीर केली आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार, सणासुदीच्या ऑफर अंतर्गत बँक वेगवेगळ्या भागीदार ब्रँडवर २२.५ टक्के कॅशबॅक देत आहेत. तर २५ प्रकारचे स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड खरेदी करणाऱ्या ग्राहकांना १५ टक्के कॅशबॅक देत आहे.

ईएमआय आणि प्रोसेसिंग फी
ICICI बँकेने ई-कॉमर्स वेबसाइटद्वारे सर्व प्रकारच्या लक्झरी वस्तूंच्या खरेदीवर मोठ्या सवलतीसह नो कॉस्ट ईएमआय ऑफर केली आहे. सणासुदीच्या काळात युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँकेने कर्ज प्रक्रिया शुल्क, दस्तऐवजीकरण शुल्क न घेण्याची घोषणा केली आहे. तर सेंट्रल बँक ऑफ इंडियाने सर्व प्रकारच्या कर्जावरील व्याजदरात कपात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here