जवळपास दीड वर्षे खराब फॉर्मशी झगडणाऱ्या विराट कोहलीला आता सूर गवसला आहे. एक महिन्याची विश्रांती घेऊन विराट कोहली आशिया चषक खेळण्यास उतरला. या मालिकेत त्यानं संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेतही त्याची कामगिरी चांगली झाली.

लक्ष्याचा पाठलाग करताना वेगळाच विराट पाहायला मिळतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात विराटनं ही बाब दाखवून दिली. टी-२०मध्ये धावांचा पाठलाग करताना विराटच्या नावावर १५३६ धावा आहेत. या यादीत ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर दुसऱ्या स्थानी आहे. दुसऱ्या डावात त्याच्या नावे ११९५ धावा आहेत.
डेथ ओव्हर्समध्ये विराटचा स्ट्राईक रेट जबरदस्त आहे. २०१९ पासून आतापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये विराटनं डेथ ओव्हर्समध्ये कमाल कामगिरी केली आहे. त्यानं २०८.३३ च्या स्ट्राईक रेटनं गोलंदाजांची धुलाई केली आहे. डेथ ओव्हर्समध्ये किमान ३०० धावा कुटणाऱ्या फलंदाजांच्या यादीवर नजर टाकल्यास स्ट्राईक रेटच्या बाबतीत कोहली दुसऱ्या स्थानी आहे. अफगाणिस्तानचा नजीबुल्लाह जादरान पहिल्या स्थानी आहे. त्याचा स्ट्राईक रेट २२२.६० इतका आहे. तर हार्दिक पांड्याचा स्ट्राईक रेट १८६.६० इतका आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.