Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Sep 28, 2022, 2:03 PM
Beed Local News : भगवान गडावरचा दसरा मेळावा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. २०१५ मध्ये पंकजा मुंडेंना भगवान गडावर दसरा मेळावा घेण्यास महंत नामदेव शास्त्री यांनी विरोध केला.

हायलाइट्स:
- भगवान गडावरचा दसरा मेळावा वादाच्या भोवऱ्यात
- भगवान गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावांचा विरोध
- २०१५ मध्ये महंत नामदेव शास्त्री यांनी विरोध केला
अहमदनगर जिल्ह्यातील खरवंडी, मालेवाडी आणि बीड जिल्ह्यातील घोगस पारगाव या गावांनी हा ठराव घेतला आहे. गडाच्या पाच किलोमीटर अंतरावर कोणताही दसरा मेळावा घेऊ नये असं या पत्रकात म्हटल आहे. संत भगवान बाबांच्या गडावर कुठल्याही प्रकारचा सामाजिक/राजकीय दसरा मेळावा आणि भाषणास प्रतिबंध घालण्यात यावा.
परंपरेनुसार दसऱ्याच्या दिवशी केवळ संत भगवान बाबा समाधीचे दर्शन आणि सीमोल्लंघन यासाठीच भाविकांना परवानगी द्यावी, असा ठराव यावेळी घेण्यात आलाय. याबाबत पंकजा मुंडे यांनी कोणतीही भूमिका माध्यमांसमोर मांडलेली नाही. माञ आता भगवान गडावरील दसरा मेळावा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.