नवी दिल्ली : जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि तुम्ही प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) अंतर्गत मोफत रेशन घेत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. ही योजना एप्रिल २०२० मध्ये कोविड काळात सुरू करण्यात आली होती. पण नंतर मार्च २०२२ मध्ये ही योजना सहा महिन्यांसाठी सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली. आणि आता केंद्र सरकारने या योजनेच्या लाभार्थ्यांना दिलासादायक बातमी दिली आहे.

शेतकऱ्यांसाठी केंद्राची विशेष योजना; दरमहा करा फक्त ५५ रुपये जमा अन् ३ हजार रुपये पेन्शन मिळवा
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) या नावाने प्रसिद्ध असलेली मोफत रेशन योजना पुढील तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे, अशी घोषणा सरकारने बुधवारी केली. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, केंद्रीय मंत्रिमंडळाने PMGKAY योजना पुढील तीन महिन्यांसाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) मार्च २०२० मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत समाविष्ट असलेल्या सुमारे ८० कोटी लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती प्रति महिना पाच किलो अन्नधान्य मोफत देण्यासाठी सुरू करण्यात आली होती.

मोठी बातमी! केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढवला
८० कोटी लोक थेट जोडलेले
सरकारच्या या योजनेची चर्चा होत आहे कारण या योजनेशी ८० कोटी लोक थेट जोडले गेले आहेत. लॉकडाऊन काळात लाभार्थ्यांचा त्रास कमी करण्यासाठी मोफत रेशन योजना सुरू करण्यात आली होती, जी तत्कालीन करोना व्हायरसमुळे लागू करण्यात आली होती. दरम्यान या योजनेच्या मुदतवाढीपूर्वी मोफत रेशन योजना ३० सप्टेंबरपर्यंत वैध होती. पण केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला मुदतवाढ दिल्याने मोफत रेशन योजना आता ३१ डिसेंबरपर्यंत वैध असेल.

EPFO ग्राहकांनो, तुमच्या पीएफ खाते नंबरमध्ये दडलेली आहे ‘ही’ खास माहिती, जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे
टप्प्या-टप्प्याने वाढली योजना
२०२०-२१ मध्ये जेव्हा मोफत रेशन योजना सुरू करण्यात आली तेव्हा PMGKAY योजना केवळ तीन महिन्यांच्या कालावधीसाठी – एप्रिल, मे आणि जून २०२० (पहिला टप्पा) साठी जाहीर करण्यात आली होती. नंतर, सरकारने ही योजना जुलै ते नोव्हेंबर २०२०२ (दुसरा टप्पा) पर्यंत वाढवली. त्यानंतर कोविड-१९ रोग देशभरात कहर करत असताना सरकारने मे आणि जून २०२१ या दोन महिन्यांसाठी मोफत रेशन योजना पुन्हा सुरू केली. त्यांनतर पुन्हा आणखी पाच महिन्यांसाठी नोव्हेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय जाहीर केला.

त्यानंतर पाचव्या टप्प्यात मोफत रेशन योजना पाचव्यांदा मार्च २०२२ पर्यंत वाढवण्यात आली. २६ मार्च रोजी केंद्राने गरिबांना ५ किलो धान्य मोफत देण्याची योजना ३० सप्टेंबरपर्यंत ८० हजार कोटी रुपयांच्या सहा महिन्यांपर्यंत वाढवली. दरम्यान, PMGKAY अंतर्गत एकूण खर्च जवळपास ३.४० लाख कोटींवर पोहोचला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here