नालासोपारा : नालासोपाऱ्यात महिला वाहतूक पोलिसाच्या अंगावर भरधाव वेगात दुचाकी घालून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत महिला पोलिसाच्या हाताला व पायाला दुखापत झाली असून आरोपी पती-पत्नीला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाहतूक पोलीस म्हणून काम करणाऱ्या प्रज्ञा दळवी या सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास पाटणकर पार्क येथील गोडाऊनवर असताना हा प्रकार घडला आहे. दळवी यांच्या अंगावर दुचाकी घालणारा आरोपी हा वकील असून ब्रजेशकुमार भेलौरिया असं त्याचं नाव आहे. दुचाकी वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याची दुचाकी टोईंग करून पाटणकर पार्क येथील गोडाऊनमध्ये आणली होती. याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपीने जप्त केलेल्या वाहनांच्या जागी जबरदस्तीने घुसून त्याने आपली दुचाकी काढली व गोडाऊनच्या मेन गेटवर जोराने आदळली.

राजकारणातील वंशवादावर पंकजा मुंडेंचं भाष्य, विधानसभेचा दाखला देत बंधू धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

महिला पोलीस प्रज्ञा दळवी यांनी आरोपीला थांबवण्यासाठी प्रयत्न केला असता आरोपीने अंगावर दुचाकी चढवून त्यांना फरफटत नेत दुखापत केली.

दरम्यान, प्रज्ञा दळवी यांनी दिलेल्या तक्रारीवरून नालासोपारा पोलिसांनी सरकारी कामात अडथळा, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ब्रजेशकुमार भेलौरिया (३१) आणि त्याची पत्नी डॉली भेलौरिया (३१) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here