पुणे :भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या भाजपमध्ये नाराज असल्याच्या बातम्या अधून मधून येतच असतात. पंकजा मुंडे आता त्यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या बद्दल केलेल्या एका वक्तव्याने पुन्हा चर्चेत आले आहेत. “मोदीजींनी सुद्धा ठरवून मला संपवायचा प्रयत्न केला तर ते सुद्धा मला संपवू शकत नाहीत”, असं वक्तव्य मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा पंधरावडानिमित्त बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई येथे आयोजित “समाजातील बुद्धिजिवी लोकांच्या सोबत संवाद” या कार्यक्रमात केले आहे. पंकजा मुंडेंच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय स्तरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत पंकजाताईंना थेट पक्षात येण्याचं निमंत्रण दिलं आहे. (bjp leader pankaja munde)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी भाजपमध्ये पंकजा मुंडे यांना संपवण्यात येत असल्याचं म्हणत त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्याच तर त्यांचा स्वागतच करू असं म्हटलंय. भाजप वंशवादाचा विषय विरोधकांसाठी वापरतो. त्यांच्या पक्षांमध्ये सुद्धा वारसदारांनी आलेली अनेक नेते आहेत. आणि पंकजाताईंचं जे वक्तव्य त्याच्यावरून असं दिसत आहे की जी लोक कामाने दमदार आहेत, जी लोकांच्या मनात आहेत, म्हणजेच मोदी साहेबांनी कितीही कितीही छल कपट किंवा कितीही यंत्रणा वापरल्या तरी लोकांच्या मनातून अशा व्यक्ती कमी होत नाहीत. त्यामुळे पंकजाताई म्हणाल्या असतील की लोकांच्या मनातील स्थान हे माझं अस्तित्व आहे ते कोणीही संपू शकत नाही आणि ते बरोबरच आहे. जर काम करणारी व्यक्ती असेल जरी ती वारसा हक्काने आली असेल आणि तिच्या लोकांच्या मनात जर त्यांचं घर असेल तर त्यांना खुद्द मोदी सुद्धा संपवू शकत नाहीत. असं रुपाली पाटील म्हणाल्या आहेत.

मोदींना राजकारणातील वंशवाद संपवायचाय, पण ते मलाही संपवू शकणार नाहीत: पंकजा मुंडे
पंकजाताईची भाजपने केलेली कोंडी, त्यांचं संपवलेलं अस्तित्व हे जगजाहीर आहे. कोणी कोणी त्यांच्या मागे त्यांच्याच पक्षातल्या ज्यांना त्या आधी जवळचे म्हणत होत्या त्या लोकांनी कशा पद्धतीने काय केले ते आम्ही सांगायची गरज नाहीये. आम्ही व्यक्ती म्हणून आणि विचार योग्य म्हणून त्यांच्या पाठीशी आहोत. प्रत्येक जण राजकीय जीवनात पक्ष म्हणून निमंत्रण देतच असतो. भाजपने सुद्धा शिंदे गट सत्तेसाठी आपल्यात घेतलाच आहे. त्यामुळे राजकारणामध्ये पक्ष म्हणून निमंत्रण देण्यात चूक नाहीये त्या अनुषंगाने पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीने याआधीच पक्षात येण्याचे निमंत्रण दिलेला आहे. असं रूपाली पाटील म्हणाल्या. जी व्यक्ती लोकांच्या मनात आहे अशा व्यक्तीला पक्षात घ्यायला हरकत नसावी असं मला वाटतं. त्यामुळे पंकजा मुंडे या राष्ट्रवादीत आल्या तर त्यांच स्वागतच आहे. अस निमंत्रणच रूपाली पाटील यांनी पंकजा मुंडे यांना दिले आहे.

करुणा मुंडेंच्या नव्या घोषणेनं राजकारण तापणार; पंकजा मुंडेंशीही संघर्ष होणार?
काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वंशवादाचं राजकारण संपवायचं आहे. मी सुद्धा वंशवादाचं प्रतीक आहे मात्र मला कोणी संपवू शकत नाही, मोदीजींनी सुद्धा ठरवून मला संपवायचा प्रयत्न केला तर ते सुद्धा मला संपवू शकत नाहीत. जर मी तुमच्या मनावर राज्य केले तर ते तसं करु शकणार नाहीत, असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे.

पुण्यात खळबळ! भाजप आमदार माधुरी मिसाळ यांना खंडणीसाठी मेसेज, पैसे न दिल्यास जीवे मारण्याचीही धमकी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here