काय म्हणतो सारंग…
२१चा होतो , द ब्राइट डे (The Bright Day) ह्या सिनेमाची संहिता लिहायला / रिसर्चसाठी मोहित टाकळकर मला वाराणसीला घेऊन गेला. आम्ही दोघे जरी एकत्र गेलो होतो तरी तिथे मात्र आपआपले जगत होतो. एका प्रकारे माझी पाहिली सोलो ट्रीप. ह्या ट्रीप मधे मी अंतर्बाह्य बदलुन गेलो. घरापासून दूर गेल्यावर आपल्याला आपल्यातलंच काहीतरी नविन नक्की सापडतं.
कोण आहे सारंग साठ्ये?
सारंगनं भाडीपाच्या माध्यमातून मराठीतील विनोदी आणि तरुणांना आकर्षित करणारा असा डिजिटल कंटेट उपलब्ध करून दिला. अल्प कालावधीतच त्याच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मने युट्यूबवर १० लाख सबस्क्रायरचा टप्पा गाठला. आशयघन आणि मनोरंजक कलाकृतीची निर्मिती करून मराठी माणसाला डिजिटल माध्यमाची गोडी लावण्यात सारंगचा सिंहाचा वाटा आहे. त्यानं हा प्लॅटफॉर्म चार ते पाच वर्षांच्या काळात तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय केला. त्याची या माध्यमावरील मांडणीही सहजसोपी आहे. निर्मात, अभिनेता आणि दिग्दर्शक अशा सर्वच पातळ्यांवर त्यानं यश मिळवलं आहे.