नवी दिल्ली : पृथ्वीवर विविध प्रकारचे प्राणी वावरतात. सामान्यतः असे मानले जाते की निसर्गाने नर आणि मादीच्या रूपात काही वैशिष्ट्ये दिलेली आहेत. उदाहरणार्थ फक्त स्त्री हीच मुलाला जन्म देऊ शकते. तथापि, काही जीवांमध्ये हे सत्य अगदी उलट आहे. होय, आपण समुद्री घोड्याबाबत चर्चा करताना हे स्पष्ट होणार आहे. आपण त्यांच्या खास वैशिष्ट्यांबद्दल बोलणार आहोत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की नर समुद्री घोडे बाळांना जन्म देतात. तुम्ही पुढील व्हिडिओ पाहून देखील खात्री करू शकता. (male seahorse gives birth)

या समुद्री घोड्याच्या वरच्या भागाची रचना घोड्यासारखी असते त्यामुळे त्यांना समुद्री घोडा म्हणतात. पुरुष मुलांना जन्म देतो हे खरे आहे पण यात मादीचा हातभार लागत नाही असेही नाही. त्याची प्रक्रिया अगदी वेगळी आहे. चला ही प्रक्रिया ५ मुद्द्यांद्वारे समजून घेऊ या.

असं वाटतं की म्हशीनं स्वेटर घातलाय…; तुम्ही हा विचित्रसा दिसणारा प्राणी पाहिला आहे का?
१. समुद्री घोड्याचे जीवनचक्र नर आणि मादीच्या नृत्याने सुरू होते.

२. या दरम्यान, मादी समुद्री घोडा आपले अंडे नर समुद्री घोड्याच्या थैलीसारख्या दिसणाऱ्या पुढच्या भागात ठेवते.

३. यानंतर नर समुद्री घोड्याच्या पिशवीत बळाचा विकास होतो. ते तेथे वाढते.

४. पुढे जन्माची वेळ येते. एक नर समुद्री घोडा एका वेळी २५०० मुलांना जन्म देऊ शकतो.

५. यात विशेष्ट गोष्ट अशी आहे की ते आकाराने खूप लहान असतात आणि बाळंतपणाच्या वेळी ते खूप वेगाने बाहेर येतात. तथापि, जन्माला आलेल्या मुलांपैकी फारच कमी जगतात.

अबब…! १० फूट लांबीची, ६० दात असलेली महाकाय पाल पाहिली आहे का?, तोंडात विष; अस्वल, म्हशींना करते फस्त
समुद्री घोड्यांना आहे धोका

समुद्री घोडे धोक्यात आहेत. त्यांना राहण्यासाठी असलेली सुरक्षित आश्रयस्थाने कमी होत आहेत. प्रचंड जागतिक व्यापारामुळे त्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. ते मासेमारीच्या वेळी ते पकडले जात आहेत. त्यांचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत औषधांसाठी वापर केला जात आहेत. त्यांना वाळवून औषधे तयार केली जातात.

मुलगा रुग्णालयात अ‍ॅडमिट आहे…; म्हातारा रडत लिफ्ट मागत होता म्हणून दिली, परंतु ते होते मोठे कारस्थान
अनेक देशांमध्ये, लोकांचा असा विश्वास आहे की ते नपुंसकत्व बरे करू शकतात आणि लैंगिक शक्ती वाढवू शकतात. काही लोक त्यांना घरी होम एक्वैरियमसाठी देखील खरेदी करतात. एका अभ्यासानुसार, १० सागरी घोड्यांची किंमत १०० अमेरिकी डॉलर्सपेक्षा जास्त असू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here