रमाकांत पाटील यांच्या कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पेझारी गाठलं. अंत्यसंस्कार करताना त्यांना मृतदेहाबद्दल शंका आली. मृतदेहाच्या मिशीचा आकार आणि रंग वेगळा असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी मृतदेहाचा फोटो रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना पाठवला. मात्र रुग्णालयानं चूक मान्य केली नाही.
मृतदेह आपल्या माणसाचा नसल्याचं लक्षात आल्यानंतर दोन्ही व्यक्तींच्या कुटुंबीयांनी रुग्णालय गाठलं. त्यानंतर रुग्णालय प्रशासनानं दोन्ही मृतदेहांची अदलाबदल केली. मृतदेह ताब्यात देण्याआधी ते नातेवाईकांना दाखवण्यात आले होते. मात्र दोन्हीकडून कोणीच आक्षेप घेतला नाही. त्यांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार द्यायला हवा होता, असं एमजीएमच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.
रमाकांत पाटील गावात ज्युस विक्रीचा व्यवसाय करायचे, तर राम पाटील शेतकरी होते. रमाकांत यांना रक्तदाबाचा आणि मधुमेहाचा त्रास होता. तर राम यांना किडणी आणि यकृताच्या समस्या होत्या. राम यांचा मृतदेह स्वीकारताना त्यांच्या नातेवाईकांनी आक्षेप घेतला होता. मात्र शवागारातील कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, अशी माहिती राम यांचे नातेवाईक असलेल्या संजय पाटील यांनी दिली.