अहमदाबाद : अहमदाबाद शहरातील गरबा मैदानावर मंगळवारी रात्री दोन मुस्लीम तरुणांना हिंदू संघटनांनी पकडल्याने तणाव निर्माण झाला. दरम्यान, चौकशी सुरु असताना काही तरुणांनी त्यांना बेदम मारहाण करुन मैदानाबाहेर काढले. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. मात्र, याप्रकरणी अद्याप पोलिसांत तक्रार दाखल झालेली नाही.

माहिती मिळताच हिंदू संघटनेचे कार्यकर्ते पोहोचले

विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते हितेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबादमधील एसपी रिंग रोडजवळ सुरु असलेल्या गरब्यात दोन मुस्लिम तरुणांच्या प्रवेशाची माहिती त्यांना मिळाली होती. यानंतर त्यांच्यासह बजरंग दलाच्या अनेक कार्यकर्त्यांनी गरबा मैदानावर पोहोचून दोघांनाही पकडले. यानंतर स्पष्टीकरण दिल्यानंतर त्यांना मैदानातून हाकलून देण्यात आले.

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये अर्शदीपने इतिहास घडवला; आजवर कोणीही करू शकले नाही असा पराक्रम
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सरप्राईज एन्ट्री केली

हितेंद्र सिंह पुढे म्हणाले की, येत्या काही दिवसांतही आमची सरप्राईज चौकशी सुरूच राहणार आहे, कारण काही पाखंडी लोक हिंदू मुलींची छेड काढण्यासाठी आणि चोरी करण्यासाठीही प्रवेश करतात. गरबा स्थळही त्यांच्यासाठी लव्ह जिहादची अड्डा बनत आहेत. हे थांबवण्याची जबाबदारी आमची आहे आणि त्यामुळेच पाखंडी लोकांविरुद्धची आमची चौकशी सुरुच राहणार आहे.

हिंदू संघटनांनी आधीच धमकी दिली होती

करोनामुळे दोन वर्षांनंतर संपूर्ण गुजरातमध्ये नवरात्रीसोबत गरब्याचे आयोजन करण्यात येत आहे. गरब्याचे आयोजन करण्यापूर्वीच विहिंप आणि बजरंग दलाने धार्मिक स्थळी अन्य धर्माच्या लोकांच्या प्रवेशावर कडक कारवाई करण्याची धमकी दिली होती. या अंतर्गत अनेक गरबा मैदानात हिंदू संघटनांचे कार्यकर्ते अचानक एन्ट्री करुन तपासणी मोहीम राबवत आहेत.

उद्धव ठाकरेंमध्ये ताकद असती तर ५० आमदार अन् १२ खासदार सोडून गेले नसते: रामदास कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here