एका कार्यक्रमामध्ये विद्यार्थिनी सॅनिटरी पॅड मोफत मिळाल्यास, गरजेच्या गोष्टींसाठी इतरांवर अवलंबून राहावं लागणार नाही अशी विनंती करताना दिसत आहेत. ‘सरकार अनेक गोष्टी मोफत देतं. मग ते आम्हाला २० ते ३० रुपयात मिळणारं सॅनिटरी पॅड देऊ शकत नाही का?,’ असं प्रश्न एका विद्यार्थिनीने केला.
यावर आयएएस अधिकारी हरजोत कौर यांनी उत्तर असं दिलं की, ‘या मागण्यांना काही शेवट आहे का? उद्या तुम्ही म्हणणार सरकार जीन्स, सुंदर बूट देईल का? आणि शेवटी जेव्हा कुटुंब नियोजनाची वेळ येईल तेव्हा सर्वांना मोफत कंडोमही लागेल’, असं उत्तर त्यांनी दिलं आहे. तुम्हाला सरकारकडून गोष्टी का हव्या आहेत? अशी विचारणा हरजोत कौर यांनी केली. ही विचारसरणी चुकीची असल्याची टीकाही त्यांनी केली. मुलींनी यावेळी सरकार निवडणुकीच्या वेळी अनेक गोष्टींचं आश्वासन देत असं सांगितलं तेव्हा त्यांनी ‘मत देऊ नका, पाकिस्तान व्हा’, असं उत्तर दिलं.
हरजोच कौर यांनी नंतर निवेदन जारी करत म्हटलं आहे की, ‘महिलांच्या हक्क आणि सक्षमीकरणासाठी लढा देण्यासाठी मला ओळखलं जातं. बिहार महिला विकास महामंडळाने ज्यांच्याविरोधात कारवाई केली आहे असं काही खोडकर घटन ज्यांचा प्रत्येक वेळी पराभव झाला आहे, ज्यांच्यावर चुकीच्या कृत्यांसाठी कारवाई करण्यात आली आहे असं लोक मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत’.