नवी दिल्ली : कर्तृत्व असावे तर असे…जगातील प्रसिद्ध टाईम मॅगझिन जगभरातील उगवत्या ताऱ्यांची यादी तयार करते. याला ‘Time100 Next’ यादी म्हणतात. या यादीत देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आणि रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी यांना स्थान मिळाले आहे. विशेष म्हणजे या यादीत आकाश एकमेव भारतीय आहेत. मात्र, या यादीत आणखी एक भारतीय वंशाच्या अमेरिकन व्यावसायिक नेत्या आम्रपाली गान यांचाही समावेश आहे.

चाळिशीखालील स्वयंसिद्ध अब्जाधीशांची यादी जाहीर, टॉपरकडे 175000000000 रुपयांची संपत्ती
कोणत्या श्रेणीमध्ये निवड झाली?
आकाश अंबानीला टाईम १०० नेक्स्ट लिस्टमध्ये स्थान मिळाले असून त्याची श्रेणी देखील अद्वितीय आहे. आकाशची लीडर्स श्रेणीत निवड झाली आहे. आकाश अंबानीबद्दल टाईम मॅगझिन म्हणते की, “ते व्यवसाय वाढवण्यासाठी खूप मेहनत करत आहे. गुगल आणि फेसबुकसोबत अब्ज डॉलर्सचे गुंतवणुकीचे सौदे पूर्ण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.” दुसरीकडे, या यादीत १०० उदयोन्मुख नेत्यांना हायलाइट केले आहे जे व्यवसाय, मनोरंजन, क्रीडा, राजकारण, आरोग्य, विज्ञान आणि सक्रियता यांचे भविष्य घडवत आहेत.

यादीत एकमेव भारतीय
‘टाइम १०० नेक्स्ट’ लिस्टमध्ये स्थान मिळवणारे आकाश अंबानी एकमेव भारतीय आहेत. जगातील उगवता स्टार आकाश अंबानीबद्दल टाईम मासिकाने मत व्यक्त करत म्हटले की, वयाच्या २२ व्या वर्षी आकाश अंबानीला जिओच्या बोर्डात स्थान मिळाले. आणि त्याच वर्षी जूनमध्ये त्यांना भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी जिओची कमान देण्यात आली. ४२ कोटी ६० लाख ग्राहक असलेल्या रिलायन्स जिओला सांभाळण्याची जबाबदारी आता अध्यक्ष आकाश अंबानी यांच्या खांद्यावर आहे.

४ कोटींच्या कारमधून कोणाला भेटायला गेले होते आकाश अंबानी, पाहा हा व्हिडीओ
आकाशच्या देखरेखीखाली जिओचे 5G
लक्षणीय आहे की रिलायन्स जिओचे 5G रोलआउट आकाश अंबानीच्या देखरेखीखाली होत आहे. दिवाळीपर्यंत दिल्ली, मुंबई आणि इतर काही महानगरांमध्ये 5G सेवा सुरू करण्याची कंपनीची योजना आहे. भारतीय दूरसंचार उद्योगातील Jio ही एकमेव कंपनी आहे जिने ७०० MHz स्पेक्ट्रम बँड विकत घेतला आहे.

मोठी बातमी; रिलायन्सने सुरू केले देशातील पहिले Reliance Centro स्टोअर, पाहा, काय-काय आहे विशेष!
भारतीय मूळची गानही यादीत

आम्रपाली गान यांची मुख्यतः पोर्नोग्राफी निर्माण करणार्‍या सेक्स वर्कर्सद्वारे वापरली जाणारी कंटेंट क्रिएटर्स साइट, ओन्लीफॅन्सची सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, ज्यात ती सप्टेंबर २०२० मध्ये मुख्य विपणन आणि संप्रेषण अधिकारी म्हणून सामील झाली होती. “तिच्या नेतृत्वाखाली ओन्लीफॅन्सने सुरक्षा आणि पारदर्शकता केंद्र सुरू केले आणि प्लॅटफॉर्मची लोकप्रियता सतत वाढत गेली,” टाईमने म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here