Rohit Pawar Birthday: महाराष्ट्रातील राजकारणात अतिशय कमी वेळातच आपली वेगळी छाप सोडणारा, यंग जनरेशनचा आयकॉन (Young Generation Icon) आणि तळागाळातील घटकांना सोबत घेऊन चालणाऱ्या रोहित पवार (Rohit Pawar) यांचा आज वाढदिवस. त्यांचावर आज सगळीकडून शुभेच्छांचा वर्षावर होतं आहे. राजकारण्यातील दिग्गजांपासून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सोशल मीडियावर रोहित पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
शरद पवार (Sharad Pawar) यांचे नातू, पवार कुटुंबातील (Pawar family) तिसरी पिढी आणि राष्ट्रवादीचे भावी प्रमुख नेते (Future major leader of NCP) म्हणून पाहिल्या जाणाऱ्या रोहित पवार त्यांचा लव्ह स्टोरीमुळेही (Love story) कायम चर्चेत असतात. रोहित पवार यांच्या कामा प्रमाणेच त्यांची प्रेम कहाणी पण खूप गाजली आहे. (Rohit Pawar and Kunti Magar-Pawar love story and Rohit Pawar Birthday nm )
रोहित पवारांच्या लग्नाची गोष्ट! (Rohit Pawar’s marriage story!)
रोहित पवार सोशल मीडियावर (Social media) सक्रीय असतात. त्यांनी मे 2022 महिन्यात आपल्या लग्नाच्या वाढदिवसांनिमित्त एक पोस्ट शेअर केली होती. रोहित पवार यांच्या आयुष्यात कुंती पवार यांचं काय स्थान आहे हे समजतं. त्यांचा लग्नाला 12 वर्षांचा तप पूर्ण झाला आहे.
प्रिय कुंती!#HappyAnniversary
माझ्या आयुष्यात ज्या दोन महिलांचा प्रभाव आहे, त्यात आई आणि तू आहेस. तुझी साथ तर फार मोलाची आहे. माझ्या प्रत्येक निर्णयात तू खंबीरपणे पाठीशी असतेस. उच्चशिक्षित असूनही स्वतःचं स्वप्न बाजूला ठेवून मुलं मोठी होईपर्यंत गृहिणी म्हणून काम करायचं तू ठरवलं. pic.twitter.com/aZBGFdqOOz— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 29, 2022
पाहता क्षणी प्रेमात पडलो!
कर्जत जामखेडचे (Karjat Jamkhed) राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) आमदार रोहित पवार आणि कुंती पवार (Kunti Pawar) यांची लव्ह स्टोरी कमालची आहे. तसं तर हे अरेंज मॅरेज होतं. रोहित पवार कुंती येण्यांना भेटण्यासाठी गेलं असता त्यांना पाहता क्षणी त्यांचा प्रेमात पडले.
डोळयांवर जीव जडला…
रोहित पवार यांनी आपल्या भावी जोडीदाराबद्दल काही कल्पना केली होती. ते म्हणतात की, ती साधी असावी, तिच्या मनात जे आहे, जे ओठावर असावं म्हणजे स्पष्ट बोलणारी असावी…आणि जेव्हा कुंतीला पाहिलं, तेव्हा कळलं डोळे बोलके असतात…त्याच क्षणी वाटलं हेच ती मुलगी…
रोहित पवार आणि कुंती मगर-पवार (Kunti Magar-Pawar) यांच्या लग्नामध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांचा खूप मोठा वाटा आहे. याबद्दल एकदा ‘झी २४ तास’शी बोलताना रोहित पवार यांनी सांगितलं होतं. आपला आणि आपली पत्नी कुंती मगर-पवार यांचा विवाह ठरवण्यासाठी दादांचा मोठा हातभार होता, असं ते म्हणाले होते.
प्रेम असावं तर असं…
पत्नी कुंती यांच्याबद्दलचं रोहित पवार यांचं प्रेम सोशल मीडियावर कायम पाहिला मिळतं. कधी लग्नाचा वाढदिवस असो किंवा बायकोचा वाढदिवस रोहित पवार खूप सुरेख पोस्ट शेअर करतात. खरं तर या दोघांचा वाढदिवसी एकाच दिवशी असतो. आजही वाढदिवसानिमित्त रोहित पवार यांनी खूप छान पोस्ट शेअर केली आहे.
Zee24 Taas: Maharashtra News