बुधवारी भारतीय शेअर बाजारातील घसरण आणि अमेरिकी शेअर बाजारातील वाढ, यामुळे अदानी अब्जाधीशांच्या यादीत मागे पडले आहेत. बुधवारी देशांतर्गत शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स ५०९ अंकांनी घसरला आणि ५६,५९८ अंकांच्या दोन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी १४९ अंकांनी घसरून १७ हजार अंकांच्या पातळीच्या खाली १६८५८.६० वर पोहोचला तर, अमेरिकेचा मुख्य संवेदी निर्देशांक डाऊ जोन्स १.८८ टक्के किंवा ५४८ अंकांनी वाढून २९,६८३ वर बंद झाला.
मामाच्या एका टोमण्यामुळे बदलले अदानींचे जीवन, जगातील तिसर्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले
अदानी समूहाचे शेअर्स घसरले
बुधवारी अदानी समूह, अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट, अदानी पॉवर, अदानी विल्मार, अदानी ग्रीन यांचे समभाग घसरणीसह बंद झाले. यामुळे अदानींना फोर्ब्सच्या रिअल टाइम अब्जाधीशांच्या यादीत नुकसान सहन करावा लागला. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्स अदानीमध्ये ते तिसऱ्या स्थानावर आहे. बुधवारी, शीर्ष १० अब्जाधीशांमध्ये अदानी ही एकमेव व्यक्ती होते, ज्यांच्या संपत्तीत १.८५ अब्ज डॉलरची घट झाली आहे.
गौतम अदानी टॉप लूजर
गौतम अदानी फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीश निर्देशांकात बुधवारी सर्वाधिक तोट्यात राहिले. त्यांची संपत्ती १.४ अब्ज डॉलरने घसरून १३६.५ अब्ज डॉलरवर आली. तर बर्नार्ड अर्नॉल्टची एकूण संपत्ती (१४२.९ अब्ज डॉलर) १.१ अब्ज डॉलरने वाढली आणि त्यांनी यादीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. तसेच इलॉन मस्क २६३.२ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह फोर्ब्सच्या यादीत नंबर १ सिंहासनावर विराजमान आहेत. बुधवारी त्यांनी ३.४ अब्ज डॉलरची कमाई केली. दुसरीकडे, रिलायंस समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी ९व्या स्थानावर आहेत.