Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Sep 29, 2022, 11:55 AM
Nashik News : एकरी सुमारे ४० हजार रुपये खर्च या शेतकऱ्याला आला होता. मात्र, रोगामुळे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त पिक खराब झाले आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.

हायलाइट्स:
- कष्टाने पिकविलेल्या टोमॅटोला कवडीमोल भाव
- उभ्या पिकात चक्क मेंढ्या सोडल्या
- नाशकातील मनमाड येथील बातमी
मनमाड शहर परिसरातील शेतकऱ्यांचा खरीप हंगामात मका, कांदा, बाजरी यासह इतर पारंपारिक पिके लागवड करण्याकडे जास्त कल असतो. मात्र, काही शेतकरी आता वेगवेगळ्या पिकाकडे देखील वळू लागले आहेत. पानेवाडी येथील साहेबराव गंभिरे यांनी यंदा कांदे ऐवजी टोमॅटोला प्राधान्य देत एक एकरात त्याची लागवड केली होती. बियाणे, मशागत, ठिबक, मल्चिंग, खत, औषधे, मंडपासाठी तार, बांबू,सुतळी, मजुरी आदीसह इतर कामे धरून एकरी किमान ४० ते ५० हजार रुपये खर्च या शेतकऱ्याला आला आहे.
सुरुवातीला दमदार पाऊस झाला त्यामुळे पिक देखील चांगले आले होते. मात्र, त्यानंतर सलग मुसळधार पाऊस झाला असून अतिवृष्टी आणि बदलत्या हवामानाचा फटका इतर पिकांसोबत टोमॅटोला देखील बसला आहे. अतिवृष्टीमुळे टोमॅटो करपासह इतर रोगाच्या विळख्यात सापडून पन्नास टक्क्यापेक्षा जास्त टोमॅटो खराब झाले आणि त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली. एकीकडे उत्पादनात गट तर दुसरीकडे भावात झालेली घसरण यामुळे पिकावर केलेला खर्च तर सोडाच वाहतुकीवर केलेला खर्च निघत नसल्याचे पाहून हवालदिल झालेल्या साहेबराव यांनी उभ्या पिकात मेंढ्या सोडून संताप व्यक्त केला.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.