Boisar Crime News: तरुणानं गोळी झाडून तरुणीची हत्या करून त्यानंतर आत्महत्या केल्याची घटना बोईसरमध्ये घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. तरुणाने केलेल्या गोळीबारात तरुणीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर तरुणाने संरक्षण दलाच्या वाहनाखाली येत आत्महत्येचा प्रयत्न केला.

जखमी झालेल्या आरोपीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी गोळीबारासाठी वापरण्यात आलेले गावठी पिस्तुल जप्त केले आहे. बोईसर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर घटना प्रेम प्रकरणातून घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी अधिक तपास बोईसर पोलीस करत आहेत.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.