सोलापूर : शिंदे गटातील अब्दुल सत्तार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हे फक्त एकनाथ शिंदे असतील. निवडणूक आयोग शिंदे गटाला चिन्ह देईल असा गौप्यस्फोट केल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. यावर युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी अब्दुल सत्तार यांना शिवसेना स्टाईलने उत्तर दिले आहे.

“अब्दुल सत्तार म्हणजे उतावळा नवरा ,गुडघ्याला बाशिंग”. शिवसेना पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण देण्याची जबाबदारी सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगावर सोपवली आहे. निवडणूक आयोग जर पक्षपाती करत निर्णय दिला तर उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक रस्त्यावर उतरतील राज्यभरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा इशारा शरद कोळी यांनी दिला आहे. ते सोलापूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.

दसरा मेळाव्यासाठी गर्दीचं टार्गेट ठरलं; जाणून घ्या शिंदे, ठाकरेंना मैदान भरवण्यासाठी किती लोक लागणार
शिंदे गट आणि निवडणूक आयोग यांनी जर ५० खोके एकदम ओके कार्यक्रम केला तर महाराष्ट्र राज्यात दंगल उसळेल. राज्यभरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशारा युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी दिला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंचा आहे. याचं धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगानने जर एकनाथ शिंदे गटाला दिलं तर शिवसैनिक रस्त्यावर उतरतील.

दरम्यान, काही दिवसांपू्र्वी राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद येथील एका कार्यक्रमादरम्यान भाषण केले होते. यावेळी तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरेंना ठणकावून सांगतो, गद्दारी तुम्ही केली, दिल्लीला गेले असते तर सत्ता टिकली असती, अशा भाषेत टीकास्त्र केले होते. यावर युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना प्रतिउत्तर दिलं होतं की, “उद्धव ठाकरेंना ठणकावून सांगणाऱ्यांना ठेचून काढू”, असा इशारा शरद कोळी यांनी शिंदे गटाला व तानाजी सावंताना दिला होता.

ठाण्यात गद्दारीचं पीक रोवलं गेलं, अंबादास दानवे आनंद दिघेंच्या देवी चरणी नतमस्तक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here