west bengal crime news: एकाचवेळी दोघांशी प्रेमसंबंध ठेवणं एका अल्पवयीन मुलीला महागात पडलं आहे. एक प्रियकर घरात असताना दुसरा प्रियकर मुलीच्या घरी आला. त्यानं दोघांना एकत्र पाहिलं आणि गोळी झाडली. यामध्ये तरुणीच्या घरात असलेला प्रियकर जबर जखमी झाला.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी घरी एकटी होती. त्यावेळी तिनं तिचा प्रियकर अंकित बर्मनला बोलावलं. याची माहिती मुलीचा दुसरा प्रियकर असलेल्या उज्ज्वलला समजली. तो प्रचंड संतापला. रागाच्या भरात तो लोडेड पिस्तुल घेऊन मुलीच्या घरी पोहोचला. तिथे त्याला अंकित मुलीसोबत दिसला. त्यानं अंकितवर गोळी झाडली आणि तिथून पळ काढला.
गोळी अंकितच्या गालाला लागली आणि गळ्यात अडकली. त्याची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. त्याच्यावर दुर्गापूर मिशन रुग्णालयात उपचार सुरू असून पुढील काही तास महत्त्वाचे आहेत. घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिकांनी गोंधळ घातला. मुलगी आणि तिच्या आईविरोधात कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. पोलिसांनी आई आणि मुलीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेलं. पोलिसांनी उज्ज्वलविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तो फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.