Authored by उमेश पांढरकर | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Sep 29, 2022, 2:04 PM
Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातून जाणारा राज्यमार्ग सहा वरील धानोरा गावाजवळ असलेल्या रंका नदीवरील बांधण्यात आलेला पुल कोसळला आहे. सकाळी नऊ वाजण्याचा सुमारास अचानक हा पूल कोसळला.

हायलाइट्स:
- राज्यमार्ग ६ वरील धानोरा गावाजवडील रंका नदीवरील पूल कोसळला
- महाराष्ट्र गुजरात सीमा वरील भागातील अनेक गावांचा संपर्क तुटला
- गुजरातकडे जाणारी वाहतूक वळवली
४० तो ४५ वर्ष जुन्या पुलाचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आले होते का? जिल्ह्यातील राज्य मार्गावर असलेल्या धोकेदायक पुलाचे स्ट्रक्चर ऑडिट होते का? असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे. गुजरातला जोडणारा महत्वपूर्ण मार्ग असल्याने या मार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली आहे.
१९८२ साली सदर पूल बांधण्यात आला होता. सुमारे ४० वर्ष जुना हा पूल होता.राज्य महामार्ग सहा पुढे थेट गुजरातकडे जातो. धानोरा जवळील रंका नदीवरील पूल आज सकाळी अचानक कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतुक मोठ्या वाहनांसाठी निझरमार्गे तर लहान वाहनांसाठी धानोरा गावातून वळवण्यात आली असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सुधीर खांदे यांनी दिली.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.