हेरिटेज इमारतीचा पुनर्विकास

मुंबईतील ऐतिहासिक स्थानक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. रेल्वे स्थानकांचा १० हजार कोटी रुपये खर्चून पुनर्विकास करण्याच्या प्रस्तावास बुधवारी केंद्र सरकारने मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत या महत्त्वाकांक्षी प्रस्तावावर शिक्कामोर्तब झाले. रेल्वे मंत्रालयानुसार, रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केल्यानंतर स्थानकांवर प्रवाशांना अधिक सुविधा मिळणार आहेत. मात्र, हा कायापालट होत असताना मध्य रेल्वेचे मुख्यालय असलेल्या या हेरिटेज इमारतीच्या मूळ सौंदर्याला धक्का न लावता हा पुनर्विकास करण्यात येणार आहे.

पर्यटकांसाठी आकर्षण

जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश असलेल्या मुंबईतील सर्वात मोठे आणि भव्य असे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे आहे. तसंच, आपल्या भव्यतेमुळे परदेशातील देशभरातील नागरिकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाची इमारत आकर्षणाचा केंद्र आहे. त्यामुळं मुळं इमारतीच्या सौंदर्याला व बांधणीचा धक्का न लावता या स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. अशी माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या सुविधांसोबत किरकोळ विक्री, कॅफेटेरिया तसेच मनोरंजन सुविधांसाठी ३६, ७२ तसेच १०८ मीटरचे विशाल छत असेल. फूड कोर्ट, प्रतीक्षालय, मुलांना खेळण्याची जागा, स्थानिक उत्पादनांच्या विक्रीसाठी जागा यासारख्या सुविधा असतील. रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूंनी स्थानकाला शहराशी जोडण्यात येईल. शहराच्या आत असलेल्या स्थानकांमध्ये सिटी सेंटरसारखी जागा असेल

जागतिक वारसा स्थळात समावेश

सध्या CSMT या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या रेल्वे स्थानकाची निर्मिती १८८७ साली व्हिक्टोरिया टर्मिनस या नावाने करण्यात आली होती. या स्थानकाच्या निर्मितीसाठी तेव्हा १६.१३ लाख रुपये इतका खर्च आला होता. या स्टेशनच्या इमारतीची रचना भारतीय वास्तुकलेचा विचार करून करण्यात आली होती. इमारतीची निर्मिती इंग्रजीमधील सी अक्षराच्या आकारात योजनाबद्ध पूर्वेकडून पश्चिम दिशेने केली होती. या इमारतीचे मुख्य आकर्षण त्याचे केंद्र आहे. या वास्तूचे वैभव लक्षात घेऊन २००४ साली युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात याचा समावेश करण्यात आला.

अशा असतील सुविधा

– स्थानकांना आरामदायी बनविण्यासाठी पुरेसा उजेड, मार्ग दाखविणारे संकेत, ध्वनिक्षेपण, लिफ्ट, एस्कलेटर, ट्रेव्हलटर

– पुरेशा पार्किंग सुविधांसह वाहतुकीचे सहजतेने संचालन करण्यासाठी नियोजन

– मेट्रो, बससारख्या साधनांनी वाहतुकीचे एकीकरण

– दिव्यांगांना अनुकूल सुविधा

– इंटेलिजन्स इमारतींच्या संकल्पनेवर रेल्वे स्थानकांचा विकास

– आगमन आणि प्रस्थानाचे विश्लेषण

– पूर्ण झाकलेले उत्तम प्लॅटफॉर्म

– सीसीटीव्ही आणि अॅक्सेस नियंत्रणामुळे रेल्वे स्थानकांची सुरक्षा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here