Maharashtra Politics | द्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे गेल्या काही दिवसांमध्ये सतत राज्यभरातील शिवसैनिकांशी वेगवेगळ्या माध्यमातून संवाद साधत आहेत. त्यामुळे आज रश्मी ठाकरे या एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात शिवसैनिकांशी कशाप्रकारे हितगूज करणार, हे पाहावे लागेल. नवरात्रौत्सवानिमित्त शिवसेनेकडून ‘बये दार उघड’ ही मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या मोहीमेचा एक भाग म्हणून रश्मी ठाकरे आज टेंभीनाक्याच्या देवीच्या दर्शनासाठी जाणार आहेत.

हायलाइट्स:
- रश्मी ठाकरे यांच्या हस्ते दुर्गेश्वरी देवीची आरती
- टेंभीनाक्यावर शिवसैनिकांची गर्दी होण्याची शक्यता
काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दापोली येथील सभेत रश्मी ठाकरे यांच्यावर टीका केली होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते कुठेही गेले तरी रश्मी वहिनी त्यांच्यासोबत असायच्या. माँसाहेब मीनाताई ठाकरे या आयुष्यात कधीही व्यासपीठावर चढल्या नाहीत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना केवळ तीन वेळा मंत्रालयात गेले आहेत. इतर वेळी ते मातोश्रीवर लपून खोके मोजण्याचे काम करत होते. तर रश्मी ठाकरे या वर्षा बंगल्यावर कंत्राटदारांना भेटत होत्या, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला होता.
रामदास कदम यांच्या या वक्तव्याचे तीव्र राजकीय पडसाद उमटले होते. या टीकेनंतर रामदास कदम यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. रश्मी ठाकरेंबद्दल मी तसं बोलायला नको होतं, मी माझे शब्द मागे घेतो, मी अनवधानाने बोलून गेलो, माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, मी वास्तव ते बोललो, ठाकरेंचा अपमान होईल असं काही बोललो नाही, पण माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असे रामदास कदम यांनी म्हटले होते.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.