Auto Rikshaw driver looted, नकली बंदूक…पांढऱ्या रंगाची स्विफ्ट, कारमधूल आले आणि रिक्षाचालकाला लुटले; पळून जाण्याचा प्रयत्नात असताना… – an autorickshaw driver was robbed by robbers coming from a car in jalgaon
जळगाव : मुक्ताईनगर येथे कारमधून आलेल्या सहा जणांनी एका रिक्षा चालकाला मारहाण करून त्याच्याकडून रोकड लुटल्याची घटना समोर आली आहे. लूट केल्यानंतर सर्व संशयित पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी अगदी सिनेस्टाईल पध्दतीने रस्त्यात ट्रक आडवा लावून संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत. (An autorickshaw driver was robbed)
मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचखेडा येथे रिक्षा चालक देविदास रामदास तायडे हे राहतात. काल २८ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास फाट्याजवळ त्यांच्या रिक्षाच्या बाजूला एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार (क्रमांक MH 02 BZ 7938) येऊन उभी राहिली. त्यानंतर त्यातून ६ जण खाली उतरले आणि त्यांनी तायडे यांना रस्त्याबाबत विचारपूस केली. यातील दोघांनी तायडे यांना रिक्षाच्या खाली ओढून त्यांच्या कारमध्ये बसविण्याचा प्रयत्न केला. याचवेळी तायडे यांच्या खिशातील १६०० रुपये आणि मोबाईल जबरीने काढून घेतला. एवढेच नव्हे तर तायडे यांना सर्वांनी लाथा बुक्यांना मारहान करुन कार पुर्नाड फाट्याच्या दिशेने कार पळवून नेली. Saptashrungi : सप्तशृंगी गडावरील बोकड बळीची प्रथा पुन्हा सुरु होणार ; उच्च न्यायालयाने दिली परवानगी याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पुर्नाड फाट्यावर वाहतूक पोलिसांनी दोन ट्रक आडवे लावले. त्यांनंतर ती कार अडवून संशयितांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे पोलिसांना कारमध्ये छर्र्यांची नकली बंदूक देखील सापडली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची चौकशीत हुसेन गुलाम रसूल शाह (वय, २० वर्षे), शेख समीर शेख शकील (वय २० वर्षे), फय्याज खान रियाज खान (वय २० वर्षे), शे. तौसीफ शे. शकील (वय २० वर्षे), रिजवान शहा रफिक शहा (वय २० वर्षे), अमीर खान, शब्बीर खान (वय २१ वर्षे, सर्व राहणार मालेगाव ) अशी नावे समोर आली.
आसाममध्ये मोठी दुर्घटना, ३० जणांना घेऊन जाणारी नाव बह्मपुत्रेत उलटली, अनेकजण बेपत्ता दरम्यान, पैसे संपल्यामुळे या सर्वांनी रिक्षा चालकाकडून लुटमार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, याप्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक राहुल बोरकर हे करीत आहेत.